Crime News: दोन बायका आणि सहा मुलांमध्ये फसला; केंद्रीय मंत्र्यांचा पुतण्या जीव गमावून बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 04:12 PM2022-11-23T16:12:29+5:302022-11-23T16:12:58+5:30

पहिली पत्नी हिंदू होती, तिचे नाव पुजा होते. तर दुसरी पत्नी मुस्लिम होती, तिचे नाव शकीला होते. दोन्ही पत्नींपासून त्याला सहा मुले होती. पूजापासून ४ आणि शकीलाला दोन मुले होती. 

Crime News: Trapped in Two Wives and Six Children; Union Minister kaushal kishore Rawat's nephew Nandkishore lost his life | Crime News: दोन बायका आणि सहा मुलांमध्ये फसला; केंद्रीय मंत्र्यांचा पुतण्या जीव गमावून बसला

Crime News: दोन बायका आणि सहा मुलांमध्ये फसला; केंद्रीय मंत्र्यांचा पुतण्या जीव गमावून बसला

Next

केंद्रीय राज्य मंत्री कौशल किशोर यांचा पुतण्या नंदकिशोर याची आत्महत्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्र्यांचा पुतण्या म्हणून नाही तर त्याच्या वैयक्तीक आयुष्यावरून चर्चा होऊ लागली आहे. त्याने आयुष्याला कंटाळून आत्महत्या केली. मालमत्ता आणि गृहकलहातून त्याने हे पाऊल उचलले आहे. 

नंदकिशोर रावत हा केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचा सख्खा पुतण्या आहे. तो प्रॉपर्टी डीलिंगचे काम करायचा. नंदकिशोर हा श्री बालाजी महाराज नावाच्या ट्रस्टचा अध्यक्षही होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसह होर्डिंग्ज लावून तो वेळोवेळी शुभेच्छा द्यायचा. 
यामुळे नंदकिशोरच्या मृत्यूची बातमी लखनौपर्यंत पोहोचली आहे. त्याने दोन लग्न केली होती. पहिली पत्नी हिंदू होती, तिचे नाव पुजा होते. तर दुसरी पत्नी मुस्लिम होती, तिचे नाव शकीला होते. दोन्ही पत्नींपासून त्याला सहा मुले होती. पूजापासून ४ आणि शकीलाला दोन मुले होती. 

शकीलाचे आणि नंदकीशोरचे मुलांवरून भांडण होत असे, तर पुजादेखील यावरून वाद घालत असायची. नंदकिशोरने सहाही मुलांच्या नावे खूप संपत्ती खरेदी केली होती. हेत त्याच्यासाठी विष बनले आणि घरात दररोज यावरून वाद होऊ लागले. जेव्हा तो दोन्ही पत्नींच्या मुलांसाठी वेगवेगळी संपत्ती खरेदी करायचा तेव्हा त्याच्या घरात आकांडतांडव व्हायचा. 

त्याने अनेकदा दोन्ही पत्नींना समजविण्याचा प्रयत्न केला, परंतू त्या काही केल्या ऐकत नव्हत्या. प्रत्येकीला आपल्याच मुलांसाठी संपत्ती खरेदी करावी असे वाटत होते. यामुळे कंटाळून त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी त्याच्या खोलीतून त्याचा तुटलेला मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे, तसेच अन्य काही वस्तू देखील ताब्यात घेतल्या आहेत. फॉरेन्सिक टीमदेखील दाखल झाली आहे. त्याची आत्महत्या की हत्या याचा शोध घेतला जात आहे. 

Web Title: Crime News: Trapped in Two Wives and Six Children; Union Minister kaushal kishore Rawat's nephew Nandkishore lost his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.