Crime News: ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी घातला ९८ हजारांचा गंडा! कानातील सोन्याच्या झुमक्यासह दोन सोनसाखळ्या पळविल्या
By अनिल गवई | Updated: September 28, 2022 14:04 IST2022-09-28T14:03:08+5:302022-09-28T14:04:26+5:30
Crime News: लहान मुलाच्या गळ्यातील ‘लॉकेट’ खरेदीसाठी ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी कानातील सोन्याचे झुमके आणि झुमक्याच्या दोन सोनसाखळ्या असे एकुण २० ग्रॅम सोने लंपास केले. ही घटना सीसी कॅमे-यात कैद झाली

Crime News: ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी घातला ९८ हजारांचा गंडा! कानातील सोन्याच्या झुमक्यासह दोन सोनसाखळ्या पळविल्या
- अनिल गवई
खामगाव: लहान मुलाच्या गळ्यातील ‘लॉकेट’ खरेदीसाठी ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी कानातील सोन्याचे झुमके आणि झुमक्याच्या दोन सोनसाखळ्या असे एकुण २० ग्रॅम सोने लंपास केले. ही घटना सीसी कॅमे-यात कैद झाली असून याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी मंगळवारी उशिरारात्री अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावर निर्मला दिनेश वर्मा (४१, रा. फरशी) यांच्या मालकीचे ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये सोमवारी लहान मुलाचे लॉकेट खरेदीसाठी दोन अनोळखी इसम मास्क बांधून आले. संबंधितांना सोन्याचे लॉकेट दाखविले असता, त्यांच्या पसंतीस न उतरल्यामुळे काही वेळ थांबून ते दुकानातून निघून गेले. दरम्या, हातचलाखी करीत दोघांनी १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके आणि १० वजनाच्या कानातील दोन सोनसाखळ्या असा एकुण ९८ हजार रुपये किंमतीचा माल लंपास केला. ही घटना ज्वेलर्समधील सीसी कॅमेºयात कैद झाली आहे. दोघांकडून चोरी करण्यात आलेल्या घटनेचे सीसी फुटेज आणि ज्वेलर्सच्या संचालिका निर्मला वर्मा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी दोन्ही अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.