धक्कादायक! 'ती' टीव्ही पाहत बसली अन् घरात मोठी चोरी झाली; 19 लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 11:34 AM2021-12-29T11:34:20+5:302021-12-29T11:45:47+5:30
Crime News : घरामध्ये दोन महिला असूनही चोरट्यांनी घरातल्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीच्या प्रकरणात चोरट्यांनी तब्बल 19 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एका महिलेला घरामध्ये TV सिरियल पाहणं चांगलंच महागात पडलं आहे. घरामध्ये मोठी चोरी झाली असून चोरट्यांनी तब्बल 19 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. तामिळनाडूतील (Tamil Nadu) कांचीपुरम (Kanchipuram) येथे चोरीची घटना समोर आली आहे. घरामध्ये दोन महिला असूनही चोरट्यांनी घरातल्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीच्या प्रकरणात चोरट्यांनी तब्बल 19 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचीपुरम येथे रात्री मोठ्या आवाजात टीव्ही लावून मालिका पाहण्यात व्यस्त असलेल्या महिलेच्या घरात घुसून चोरट्यांनी 19 लाखांचे दागिने चोरले आणि आणि ते पसार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला रात्री उशिरा टीव्ही पाहत होत्या, त्यादरम्यान टीव्हीचा आवाज खूप मोठा होता. महिला टीव्ही पाहण्यात एवढ्या व्यस्त होत्या की त्यांच्या घरात चोर शिरल्याचे त्यांना समजलंच नाही.
पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही महिलांनी टीव्ही पाहण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा बंद केला नाही. महिलांच्या या चुकीमुळे मुखवटा घातलेल्या चोरट्यांनी घरात घुसून महिलेला आणि तिच्या नातेवाईकाला चाकूच्या धाक दाखवून बंधक बनवलं आणि नंतर घर लुटलं असं म्हटलं आहे. तामिळनाडूची ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स एकमेकांना घरी कसे सुरक्षित राहायचं आणि चुकूनही चोरी होऊ नये म्हणून गोष्टी कुठे लपवल्या पाहिजेत याची सिक्रेट शेअर करत आहेत.
एका युजरने यावर कमेंट करताना लिहिले की, जर तुम्हाला जास्त सामान घरात कुठेतरी ठेवायचे असेल तर ते कपाट किंवा तिजोरीत नाही तर किचन किंवा बाथरूमच्या बॉक्समध्ये ठेवा. त्याच वेळी, एका युजरने म्हटलं की, प्रत्येकाने घरात प्रवेश करताच मुख्य दरवाजा लॉक करण्याचा सल्ला दिला आहे. या चोरीच्या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.