Video - गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण, 30 सेकंदात मारल्या 10 थोबाडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 02:07 PM2022-07-14T14:07:47+5:302022-07-14T14:09:28+5:30

Crime News : संतापलेल्या शिक्षिकेने मुलीला अक्षरश: बेदम मारलं. 30 सेकंदात तिला 10 वेळा थोबाडीत मारलं.

Crime News unnao the teacher slapped girl student 10 in 30 seconds viral video | Video - गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण, 30 सेकंदात मारल्या 10 थोबाडीत

Video - गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण, 30 सेकंदात मारल्या 10 थोबाडीत

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका सरकारी शाळेत 5 वर्षांच्या चिमुकलीला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीने गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने मुलीला अक्षरश: बेदम मारलं. 30 सेकंदात तिला 10 वेळा थोबाडीत मारलं. मार खाल्ल्यामुळे मुलीचा चेहरा सुजला होता. मुलगी जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिचा चेहरा पाहून पालकांना मोठा धक्का बसला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

पालकांनी या प्रकरणी शाळेत जाऊन तक्रार केली. त्यावेळी शिक्षिकेने पालकांची माफी मागून पोलीस तक्रार न करण्याची विनंती केली. शिक्षिका मुलीला मारत असताना कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव येथील इस्लामनगर प्राथमिक विद्यालयात ही भयंकर ही घटना घडली आहे. 

आरोपी शिक्षिकेचं नाव सुशीला कुमारी शिक्षामित्र असं आहे. शिक्षिकेने रमेश कुमार यांची मुलगी तन्नू हिला गृहपाठ न केल्याप्रकरणी मारहाण केली आहे. ही मुलगी केवळ पाच वर्षांची आहे. ही घटना खिडकीमधून कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

लहान मुलीला मारहाण केल्याप्रकरणी या शिक्षिकेविरोधात कलम 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएसए संजय तिवारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. जो पर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षिकेला निलंबित केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News unnao the teacher slapped girl student 10 in 30 seconds viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.