बापरे! ISRO तील शास्त्रज्ञाच्या पत्नीने रचला 25 लाख लुटण्याचा कट; चोरीचा प्लॅन ऐकून पोलीस हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 10:31 AM2022-04-03T10:31:30+5:302022-04-03T10:33:16+5:30
Crime News : पोलिसांनी आरोपींकडून दागिने आणि रोख रक्कमही जप्त केली आहे. पोलीस सध्या ज्युनियर सायंटिस्टच्या पत्नीची चौकशी करत आहेत.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील (UP Hardoi) हरदोई जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी इस्रोच्या ज्युनियर सायंटिस्टच्या पत्नीने स्वत: च्याच घरी 25 लाख लुटण्याचा कट रचला होता. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ज्युनियर सायंटिस्टची पत्नी आणि मेहुणी आणि अन्य एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दागिने आणि रोख रक्कमही जप्त केली आहे. पोलीस सध्या ज्युनियर सायंटिस्टच्या पत्नीची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या महिलांमध्ये ज्युनियर सायंटिस्ट शशांक शुक्ला यांची पत्नी मुस्कान, मेहुणी तनू दीक्षित आणि अमिता गुप्ता नावाची महिला आहे.
तनू आणि अमिता या दोघी कोतवाली शहरातील सीतापूर रोड येथील रहिवासी आहेत. इस्रोचे ज्युनियर सायंटिस्ट शशांक यांच्या घरातून 29 मार्च रोजी 25 लाखांची रोकड आणि दागिने लुटल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला आरोपी बनवलं आहे. ज्युनियर सायंटिस्ट शशांक शुक्ला यांची आई कांती देवी यांनी फिर्याद दिली होती की, 3 मास्क घातलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्या घरात घुसून तिला मारहाण करून तिचे दागिने आणि रोख रक्कम लुटली. पोलिसांच्या पथकांनी तपास सुरू केला तेव्हा सुरुवातीपासूनच पोलिसांना या घटनेत जवळचे कोणीतरी असण्याची शक्यता दिसली.
सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तपासणी आणि माहिती देणाऱ्यांद्वारे पोलिसांना ज्युनियर सायंटिस्टच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचाच यात सहभाग असल्याचे संकेत मिळाले. पोलिसांना मुस्कानची बहीण तनू आणि तिची मैत्रीण अमिता यांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पोलिसांनी ब्युटी पार्लर चालवणाऱ्या तनू आणि अमिता यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. दोघांच्या सांगण्यावरून दरोड्यात गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. दोघींनी सांगितलं की, मुस्कानने तिचे दागिने बहीण तनू आणि तिच्या मित्राला खूप दिवसांपूर्वी दिले होते. तनू आणि तिचा मित्र दागिने परत करू शकले नाहीत.
मुस्कानचा दीर आणि नणंदेचं लग्न होणार होते, त्यात मुस्कानला तिचे दागिने घालायचे होते, पण तिच्याकडे दागिने नव्हते. त्यामुळे तिने बहीण तनू आणि त्याची महिला मैत्रिण अमिता यांच्यासोबत दरोड्याचा प्लॅन आखला. ज्या अंतर्गत त्याने आधीच आपल्या सासू आणि नंणदेचे दागिने त्याची महिला मैत्रिण अमिता हिला दिले होते. यानंतर स्वत:ला इजा करून लुटमारीची गोष्ट रचली. पोलीस ज्युनियर सायंटिस्टची पत्नी मुस्कानची चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलीस मुस्कानची बहीण तनूच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.
हरदोईचे एसपी राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, 29 मार्चच्या संध्याकाळी पोलिसांना शहरातील रेल्वे गंज चौकीखाली माहिती मिळाली होती की, तीन दरोडेखोरांनी एका घरात एका गर्भवती महिलेवर हल्ला केला आणि 25 लाख रुपये लुटले. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत प्रकरणाचा आढावा घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एकही चोरटे कुठेही ये-जा करताना दिसले नाहीत. यानंतर तपास स्वाट, सर्वेलन्स आणि SOG टीमकडे सोपवण्यात आला. तपासाअंती पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.