धक्कादायक! 'डोळे फोडून मान कापून टाकू'; भाजपाचा झेंडा लावणाऱ्या तरुणाला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 02:56 PM2022-04-01T14:56:47+5:302022-04-01T14:58:51+5:30

Crime News : भाजपाचा झेंडा लावणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणाने घरावर भाजपाचा झेंडा लावताच शेजाऱ्यांनी त्याला 'डोळे फोडून तुझी मान कापून टाकू' अशी धमकी दिली आहे.

Crime News up kanpur musilm bjp supporter threat up police yogi government | धक्कादायक! 'डोळे फोडून मान कापून टाकू'; भाजपाचा झेंडा लावणाऱ्या तरुणाला धमकी

धक्कादायक! 'डोळे फोडून मान कापून टाकू'; भाजपाचा झेंडा लावणाऱ्या तरुणाला धमकी

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचा झेंडा लावणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणाने घरावर भाजपाचा झेंडा लावताच शेजाऱ्यांनी त्याला 'डोळे फोडून तुझी मान कापून टाकू' अशी धमकी दिली आहे. इतकंच नाही तर त्याला बेदम मारहाण देखील केली आहे. जीव धोक्यात असल्याने तरुणाने आता पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या किदवई नगरमधील जूही लाल कॉलनीत ही घटना घ़डली आहे. शकील अहमद असं या तरुणाचं नाव असन तो आधी दिल्लीतील एका मल्टी नॅशनल कंपनीत काम करत होता. यानंतर शकील कानपूरमध्ये आपल्या घरी आला. तिथे तो ज्वेलरीचा बिझनेस करायचा. शकीलने दिलेल्या माहितीनुसार, 2013 पासून मी भाजपाचा समर्थक आहे. मला मोदी फार आवडतात. त्यामुळेच मी यावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावला. तर संपूर्ण परिसरात काँग्रेसचे झेंडे लावण्यात आले होते. 

भाजपाचा झेंडा लावल्याने शेजारी खूप नाराज झाले होते. त्यांनी मी घरावर लावलेला झेंडा काढला आणि तो फेकून दिला. पण पुन्हा झेंडा लावला. तेव्हा शेजारी राहणाऱ्या शाहनवाजने मला जीवे मारण्याची धमकी दिली. तुझे डोळे फोडून मान कापून टाकू असं म्हणत धमकी दिली. तसेच या लोकांनी मला अनेकदा मारहाण केली आहे असं शकीलने म्हटलं आहे. पोलिसांनी शकीलच्या तक्रारीनुसार, शाहनवाज, राशिद, रिजवान आणि भल्लूसोबत काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News up kanpur musilm bjp supporter threat up police yogi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.