भयंकर! 2 लाखांच्या कर्जाचं ओझं; 4 चिमुकल्यांसह हतबल पित्याने घेतलं विष; मन सुन्न करणारी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:51 PM2021-08-18T14:51:59+5:302021-08-18T14:57:30+5:30

Crime News : बँकेतून दोन लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण त्या कर्जाची परतफेड करणं अत्यंत कठीण होऊन बसलं होतं.

Crime News uttar pradesh mirzapur father 4 children poison 2 lakh loan wife dispute | भयंकर! 2 लाखांच्या कर्जाचं ओझं; 4 चिमुकल्यांसह हतबल पित्याने घेतलं विष; मन सुन्न करणारी घटना 

भयंकर! 2 लाखांच्या कर्जाचं ओझं; 4 चिमुकल्यांसह हतबल पित्याने घेतलं विष; मन सुन्न करणारी घटना 

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक मन सुन्न करणारी घटना करणार घटना घडली आहे. 2 लाखांच्या कर्जाचं ओझं झाल्याने 4 चिमुकल्यांसह एका हतबल पित्याने विष घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झापूरमध्ये एका वडिलांनी आपल्या चारही लहान मुलांना विष खायला दिलं. त्यानंतर स्वत: ही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये वडील आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्या दोघांना उपचारासाठी वाराणसीच्या ट्रामा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. 

बँकेतून दोन लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण त्या कर्जाची परतफेड करणं अत्यंत कठीण होऊन बसलं होतं. आर्थिक परिस्थिती ही बेताचीच असल्याने पती पत्नीत नेहमीच वाद होत होते. याच वेळी दारूच्या नशेत असलेल्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं. काशीराम परिसरात राहणाऱ्या राजेशने दारूच्या नशेच विजय, सुमन, साधना आणि धीरज या आपल्या चार मुलांना जेवणामध्ये विष टाकून खाण्यास दिलं. त्यानंतर त्याने स्वत:ही विष घेतलं. यानंतर पाचही जणांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने जवळच्या प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. 

पाचही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मिर्झापूर येथील रुग्णालयात जा असा सल्ला देण्यात आला. जिथे पोहचल्यावर डॉक्टरांनी राजेश आणि त्याच्या दोन मुलांना मृत घोषित केलं. सुमन आणि विजय यांचा मृत्यू झाला. तर साधना आणि धीरज यांची प्रकृती आता अत्यंत गंभीर झाली आहे. राजेशच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, राजेशने तीन बँकांमधून जवळपास दोन लाखांचं कर्ज घेतं होतं. पण ते त्याची परतफेड करू शकत नव्हते. बँकेचे अधिकारी देखील कर्जाची वसूली करण्यासाठी घरी आले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

काय सांगता? मृत्यूनंतर 19 तासांनी मुलगा पुन्हा श्वास घेऊ लागला अन् चमत्कार झाला; पण...

 देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडली आहे. तीन दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी दुपारी 3 वाजता एका अल्पवयीन मुलाला मृत घोषित केलं. मात्र मृत्यूनंतर 19 तासांनी पुन्हा मुलगा श्वास घेऊ लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर मंगळवारी सकाळी 10 वाजता त्याचे कुटुंबीय मृतदेह घेऊन आपल्या घरी पोहोचले. तर मृत्यूनंतर 19 तासांनी त्याच्या शरीरामध्ये पुन्हा काही हालचाली जाणवू लागल्या. यानंतर तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलावर 4 तास उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच या मुलाचा मृत्यू झाला. 

Web Title: Crime News uttar pradesh mirzapur father 4 children poison 2 lakh loan wife dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.