Crime News: दिराच्या प्रेमात वहिनी वेडी झाली, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आली, नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 01:06 PM2022-03-11T13:06:32+5:302022-03-11T13:07:11+5:30
Crime News: बिहारमधील भागलपूरमध्ये वहिनी आणि दिराच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे दिराच्या प्रेमात वेडी झालेली एक महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलासोबत पोलीस ठाण्यात आली. तिथे तिने चांगलाच गोंधळ घातला. एकंदरीत प्रकार ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
पाटणा - बिहारमधील भागलपूरमध्ये वहिनी आणि दिराच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे दिराच्या प्रेमात वेडी झालेली एक महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलासोबत पोलीस ठाण्यात आली. तिथे तिने चांगलाच गोंधळ घातला. एकंदरीत प्रकार ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. ही घटना जोगसर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाचा विवाह १० वर्षांपूर्वी गोड्डा धमनीतील रहिवासी असलेल्या महिलेसोबत झाला होता. मात्र लग्नानंतर सहा वर्षांनी या तिच्या पतीचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ही महिला झारखंडमध्ये जाऊन राहू लागली.
या दरम्यान, ती तिच्या पतीच्या धाकट्या भावाच्या प्रेमात पडली. दोघांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. त्यांच्यातील जवळीक दिवसेंदिवस वाढू लागली. ती सांगते की, तिने तिच्या दिरासोबत कुटुंबीयांच्या सहमतीने विवाह केला आणि एकत्र राहू लागले. महिलेने आरोप केला की, आता तिच्या सासरची मंडळी तिच्या दिराचा दुसरा विवाह करण्याच्या तयारीत आहेत. तिला याची माहिती जशी समजली, तसे तिने त्वरित झारखंडहून बिहारमध्ये धाव घेतली.
ही महिला भागरपूरच्या जोरसर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने पतीसह जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेऊ लागली. तसेच तिने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीचा विवाह दुसरीकडे होता कामा नये. यादरम्यान, महिलेच्या सासरच्या मंडळींनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आपल्या मुलाचा सुनेसोबत विवाह झाला नसल्याचे सांगू लागले. त्यामुळे पोलीस ठाण्यात जोरदार राडा झाला.
सदर महिलेने पोलिसांसमोर अनेकदा आपला दुसरा विवाह झाल्याचे कागद दाखवले. तसेच कोर्टात जाण्याचा इशारा दिला. दरम्यान, बंटी नावाचा तरुण आता वहिनीसोबत राहण्यास नकार देत आहे. पोलीस आता दोघांमध्येही तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सध्यातरी कुठलाही निर्णय होत नाही आहे. दरम्यान, या महिलेच्या सासूने सांगितले की, माझ्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर सून माहेरी जाऊन राहिली. जेव्हा तिला आणायला जायचो तेव्हा ती यायची नाही.