Crime News : व्हिडीओमध्ये मित्रच मुलीवर बलात्कार करताना दिसला, वडिलांनी आरोपीला क्रूर शिक्षा देत बदला घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 04:31 PM2021-09-05T16:31:05+5:302021-09-05T16:31:13+5:30
Crime News:
मॉस्को - एका व्यक्तीने त्याच्या आठ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना रशियामध्ये घडली आहे. (Crime News) या बलात्कार प्रकरणातील आरोपी हा हत्या करणाऱ्या व्यक्तीचा मित्र होता. सदर व्यक्तीने त्याच्या मुलीवर बलात्कार हो असतानाचा व्हिडीओ मित्राच्या मोबाईलमध्ये पाहिला होता. त्यानंतर त्याने या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. (In the video, a friend was seen raping a girl, The father took revenge by killing the accused)
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार रशियामधील रॉकेट इंजिन कारखान्यातील कर्मचारी असलेला ३४ वर्षीय व्याचेस्लाव गावामध्ये आपल्या ३२ वर्षीय मित्र ओलेग स्विरिडोव्ह याच्यासोबत मद्यप्राशन करत होता. या दरम्यान, व्याचेस्लाव्हने अचानक ओलेग याचा मोबाईल घेऊन सर्च करण्यास सुरुवात केली. .या मोबाईलमध्ये कथितपणे ओलेग आणि त्याच्या मुलीचा व्हिडीओ सापडला. .या व्हिडीओमध्ये ओलेग हा त्याच्या मुलीवर बलात्कार करत असल्याचे व्याचेस्लाव्हला दिसले. तो व्हिडीओ पाहून व्याचेस्लाव्हच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानंतर ओलेगसोबत त्याची वादावादी सुरू झाली. मात्र संधी पाहून ओलेग तिथून पसार झाला.
दरम्यान, व्याचेस्लाव्हने पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकार कथन केला. तसेच ओलेग स्विरिडोव्हविरोधात मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. तसेच तो स्वत:ही ओलेगचा शोध घेऊ लागला. दरम्यान, व्याचेस्लाव्हला ओलेग सापडला. तेव्हा दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. त्यानंतर व्याचेस्लाव्हने ओलेगची चाकूने भोसकून हत्या केली. पोलिसांना ओलेगचा मृतदेह गावाजवळील जंगलामध्ये सापडला. आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून व्याचेस्लाव्हला ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ओलेगच्या मोबाईलमध्ये अजून अनेक मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ होते. त्यामुळे मित्राची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपी वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येऊ नये. कारण आरोपीने त्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तो खुनी नाही आहे. त्याने आपल्या आणि आमच्या मुलांचे रक्ण केले आहे. प्रत्येक जण त्याच्या बाजूने आहेत. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता कामा नये, असे एका व्यक्तीने सांगितले.