चोरीला गेलेला मोबाइल कुठे सापडतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 10:09 AM2021-12-28T10:09:06+5:302021-12-28T10:09:29+5:30

Crime News : गर्दीच्या ठिकाणी मोबाईल तसेच किमती ऐवज सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

Crime News : Where can I find a stolen mobile phone? | चोरीला गेलेला मोबाइल कुठे सापडतो का?

चोरीला गेलेला मोबाइल कुठे सापडतो का?

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहे. तर, दुसरीकडे मोबाईल पुन्हा मिळण्याचे प्रमाणही कमी आहे. गेल्या ११ महिन्यात मुंबईत चोरीच्या ४ हजार ९८ घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद आहे. यापैकी, अवघ्या १ हजार ६४२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळा
गर्दीच्या ठिकाणी मोबाईल तसेच किमती ऐवज सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. तसेच एकटे जात असतानाही काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलिसांकड़ून देण्यात येत आहे.

मोबाइल मिळूनही हाती लागेना
चोरीचा मोबाईल मिळूनदेखील प्रयोगशाळेत प्रलंबित राहिल्यामुळे तक्रारदार अर्चना प्रधान यांना वर्ष उलटूनही मोबाईल मिळत नसल्याचेही समोर आले आहे.

ज्येष्ठ नागरिक होताहेत सॉफ्ट टार्गेट
ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट होताना दिसत आहेत. यात, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हातून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनाही घडत आहेत.

धूम स्टाईलने मोबाइल चोरी
अनेक प्रकरणांत धूम स्टाईलने दुचाकीवरून आलेली टोळी मोबाईल हिसकावून पळ काढतात. काही घटनांत घरातून मोबाईल चोरी झाल्या आहे. 

कोणत्या महिन्यात किती मोबाइलची चोरी
जानेवारी    ४१२
फेब्रुवारी    ३५०
मार्च    ३६६
एप्रिल    २५८
मे    ३०३
जून    ३४२
जुलै    ३८८
ऑगस्ट    ४४५
सप्टेंबर    ४२३
ऑक्टोबर    ४३२
नोव्हेंबर    ३८०

- मोबाईल चोरीच्या संशयातून मुंबईत हत्येच्याही घटना घडल्या आहेत.

Web Title: Crime News : Where can I find a stolen mobile phone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.