खळबळजनक! मदतीसाठी गेलेल्या WHO च्या 21 कर्मचाऱ्यांनी महिलांवर केला बलात्कार; रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:58 PM2021-09-30T19:58:09+5:302021-09-30T20:03:20+5:30
WHO workers sexually abused women : तपासामध्ये भयावह वास्तव समोर आल्यानंतर WHO प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या कर्मचाऱ्यांबाबत एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. WHO च्या तब्बल 21 कर्मचाऱ्यांनी कांगोमध्ये अल्पवयीन मुली आणि महिलांवर बलात्कार केल्याची, त्यांचं लैंगिक शोषण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका तपासादरम्यान ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे. आफ्रिकी देशांमध्ये 2018 ते 2020 दरम्यान या संतापजनक घटना घडल्या आहे. WHO चे कर्मचारी इबोला महामारीसोबत लढण्यासाठी या ठिकाणी गेले असताना हा प्रकार घडला आहे.
तपासामध्ये भयावह वास्तव समोर आल्यानंतर WHO प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच गुन्हा केलेल्या कर्मचाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळायला हवी असं देखील म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलांचं देखील लैंगिक शोषण करण्यात आवं आहे. जवळपास 83 लोकांना या दरम्यान महिलांवर अत्याचार केले. यात जागतिक आरोग्य संघटनेच्या तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता.
महिलांना नोकरीचं आश्वासन देऊन त्याचं लैंगिक शोषण
पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना ड्रिंकमधून नशा आणणारे पदार्थ दिले जात होते. तर काही महिलांना नोकरीचं आश्वासन देऊन त्याचं लैंगिक शोषण करण्यात आलं. तसेच आरोपी यानंतर अबॉर्शन करण्यासाठी दबाव टाकायचे. कांगोमध्ये इबोला महामारीने जवळपास दोन हजार लोकांचा मृत्यू झाला. हा रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी WHO च्या वतीने कामावर ठेवण्यात आलेल्या लोकांनी लोकांची सेवा करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी असं काम केलं याचं दु:ख होत आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.