Crime News: ...म्हणून पत्नीने साथीदाराच्या मदतीने केली पतीची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:23 AM2021-10-12T09:23:32+5:302021-10-12T09:24:38+5:30

Crime News : पत्नीने आपल्या साथीदाराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी भिवंडीत घडली. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पत्नीस पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News: ... Wife killed her husband with the help of her partner | Crime News: ...म्हणून पत्नीने साथीदाराच्या मदतीने केली पतीची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

Crime News: ...म्हणून पत्नीने साथीदाराच्या मदतीने केली पतीची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

Next

भिवंडी : पत्नीने आपल्या साथीदाराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी भिवंडीत घडली. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पत्नीस पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तिचा साथीदार फरार आहे. 

संजय काशिनाथ पागी (३८) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर सविता संजय पागी (३५) आणि वडपा येथे राहणारा अक्षय हरिश्चंद्र काळण असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. अक्षय हा माझा मानलेला भाऊ आहे, असे आरोपी सविता नेहमी सांगत होती. मात्र संजय यास या दोघांवर संशय येत होता. त्यातच मृत संजय याने अक्षय यास घरी येण्यास मनाई केली होती, तरीदेखील अक्षय याचे संजयच्या घरी नेहमीच येणे-जाणे असायचे. त्यावरून संजय व सविता यांच्यात जोरदार भांडण व्हायचे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास संजय व सविता यांच्यात वाद सुरू असल्याचा राग आल्याने सविताने अक्षय हिच्या मदतीने संजयची गळा आवळून हत्या केली. 

या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात सविता व अक्षय यांच्याविरोधात रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सविता हिला अटक केली आहे. सोमवारी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Crime News: ... Wife killed her husband with the help of her partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.