नवऱ्याला लोकेशन विचारलं अन् नंतर बॉयफ्रेंडला सांगितलं; पत्नीने 'असा' काढला पतीचा काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:56 PM2023-01-12T18:56:29+5:302023-01-12T18:57:24+5:30
नवरा प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळेच त्याचा काटा काढला.
हरियाणातील पलवलमध्ये एका डिलिव्हरी बॉयची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यामुळे काही तासांनंतर हत्येला जबाबदार असणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. डिलिव्हरी बॉयची हत्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने केल्याचं आता उघड झालं आहे. नवरा त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळेच त्याचा काटा काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वडील रामदास गौतम यांनी पोलीस ठाण्यात मुलाच्या हत्येची तक्रार दिली होती. आपण मथुराचा रहिवासी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. ते पाटबंधारे विभागात काम करतात. यापूर्वी त्यांची पोस्टिंग अलीगड जिल्ह्यातील खैर गावात होती. यानंतर त्यांची पलवल येथे बदली करण्यात आली. तेव्हापासून ते पलवलच्या कानूनगो परिसरात आपल्या मुलांसोबत राहत होते. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. सर्व विवाहित आहेत.
रामदास गौतम य़ांचा धाकटा मुलगा संजय गौतम उर्फ गुड्डू हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय होता. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो कामासाठी घरातून निघाला होता. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की पलवलच्या हुड्डा सेक्टर 12 मध्ये मुलगा संजय मृतावस्थेत पडला आहे. त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलीस पथक तातडीने या प्रकरणाच्या तपासात गुंतले.
संजय हा फूड डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संजयच्या पत्नीशिवाय कुटुंबातील सदस्य आणि त्याच्या साथीदारांचीही चौकशी करण्यात आली. पत्नीच्या बोलण्यावर संशय आल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. पत्नी पारुलला पोलिसांसमोर सत्य फार काळ लपवता आले नाही. शेजारी राहणाऱ्या गोपालसोबत तिचे संबंध असल्याचे तिने सांगितले. प्रेमात नवरा अडथळा ठरत होता, म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्याला मारण्याचा कट रचल्याचं म्हटलं.
पत्नीने फोन करून लोकेशन सांगितलं, लिफ्टच्या बहाण्याने प्रियकराने त्याच्यावर गोळी झाडली. आरोपी पत्नी पारुलने सांगितले की, मी पतीला फोन करून लोकेशन विचारले. यानंतर गोपालला नवऱ्याची माहिती दिली. रात्री काम आटोपून संजय घरी येत असताना वाटेत गोपालने त्याला अडवून लिफ्ट मागितली आणि नंतर संजयवर गोळ्या झाडल्या. पारुलने सांगितल्यानंतर पोलिसांनी गोपाललाही अटक केली. गोपालची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हाही मान्य केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"