संतापजनक! हुंड्यासाठी पतीने पत्नीला जिवंत जाळलं; घरातच दफन केलं, 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:41 PM2022-03-08T20:41:59+5:302022-03-08T20:50:14+5:30

Crime News : हुंड्यासाठी पती हैवान झाला असून त्याने पत्नीला जिवंत जाळलं. धक्कादायक बाब म्हणजे त्याने अर्धवट जळालेलं शरीर घरामध्येच दफन केलं आहे.

Crime News wife murder husband arrested for allegedly burning and burying in assam | संतापजनक! हुंड्यासाठी पतीने पत्नीला जिवंत जाळलं; घरातच दफन केलं, 'अशी' झाली पोलखोल

संतापजनक! हुंड्यासाठी पतीने पत्नीला जिवंत जाळलं; घरातच दफन केलं, 'अशी' झाली पोलखोल

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना आता समोर आली आहे. हुंड्यासाठी पती हैवान झाला असून त्याने पत्नीला जिवंत जाळलं. धक्कादायक बाब म्हणजे त्याने अर्धवट जळालेलं शरीर घरामध्येच दफन केलं आहे. आसाममध्ये ही भयंकर घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून ते अधिक तपास करत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या करिमगंज जिल्ह्यातील पत्थरकांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जमालुद्दीन असं आरोपीचं नाव आहे. रविवारी रात्री त्याने आपली दुसरी पत्नी खुदेचा बेगमची हत्या केली. तिला जाळलं आणि तिचं अर्धवट जळलेलं शरीर घरातच दफन केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये हुंड्यावरून भांडणं झाली होती. हा वाद विकोपाला गेला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून रविवारी रात्री शेजाऱ्यांनी माहिती दिली. 

पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी येत जमालुद्दीनच्या घरची तपासणी केली तेव्हा त्याच्या पत्नीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पत्थरकांडी पोलीस ठाण्यातील अधिकारी समरजीत बसुमतारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमालुद्दीनला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हुंड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की जमालुद्दीनच्या पहिल्या पत्नीने त्याला सोडून दुसरं लग्न केलं. 

दोन वर्षांपूर्वी जमालुद्दीनने जवळच्या गावातील खुदेजा बेगमशी लग्न केलं. पती वारंवार हुंडा मागत होता म्हणून वैतागलेली खुदेजा बेगम आपल्या वडिलांच्या घरी राहायला गेली होती. 15 दिवसांपूर्वीच ती आपल्या नवऱ्याच्या घरी येण्यासाठी तयार झाली. त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: Crime News wife murder husband arrested for allegedly burning and burying in assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.