Crime News: पत्नीने मटण बनवण्यास दिला नकार, संतप्त पती १०० नंबरवर लावत राहिला फोन, पोलीस आले आणि केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:25 PM2022-03-20T20:25:44+5:302022-03-20T20:26:28+5:30

Crime News: होळीदिवशी हा पती पत्नीला मटण बनवायला सांगत होता. मात्र पत्नीने त्यास नकार दिला. पत्नीने मटण न बनावल्याने नवीनचा राग अनावर झाला. त्याने रागाच्या भारात १०० नंबवरवर वारंवार फोन केले आणि पत्नीची तक्रार करण्याचा प्रयत्न केला.

Crime News: Wife refuses to make mutton, angry husband keeps calling 100 number, police come and take action | Crime News: पत्नीने मटण बनवण्यास दिला नकार, संतप्त पती १०० नंबरवर लावत राहिला फोन, पोलीस आले आणि केली कारवाई 

Crime News: पत्नीने मटण बनवण्यास दिला नकार, संतप्त पती १०० नंबरवर लावत राहिला फोन, पोलीस आले आणि केली कारवाई 

googlenewsNext

हैदराबाद - तेलंगणामध्ये एक विचित्रच घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने पत्नीची तक्रार करण्यासाठी सहा वेळा १०० नंबरवर फोन केला. या व्यक्तीचे नव नवीन असे असून, फोन केला तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. पत्नीने मटण न बनवल्याने तो संतापला होता. त्यातून त्याने पोलिसांना वारंवार फोन केला अखेर पोलिसांना घरी येत त्याच्यावरच कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. 

होळीदिवशी नवीन हा पत्नीला मटण बनवायला सांगत होता. मात्र पत्नीने त्यास नकार दिला. पत्नीने मटण न बनावल्याने नवीनचा राग अनावर झाला. त्याने रागाच्या भारात १०० नंबवरवर वारंवार फोन केले आणि पत्नीची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांना कुणीतरी खोडसाळपणा करतोय, असे वाटले म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र वारंवार कॉल येऊ लागल्याने अखेर नवीनवर पोलिसांनी कारवाई केली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला घरी जात ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीनवर भादंवि कलम २९० आणि ५१० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पती मद्यपान करून आल्याने नाराज झालेल्या पत्नीने मटण बनवण्यास नकार दिला होता. आता पोलिसांनी लोकांना आवाहन करताना सांगितले की, अशा प्रकारे फोन केल्याने पोलिसांच्या कामात अडथळे निर्माण होतात. ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना मदत मिळत नाही. त्यामुळे १०० नंबर हा गरजेच्या वेळीच वापरावा.  

Web Title: Crime News: Wife refuses to make mutton, angry husband keeps calling 100 number, police come and take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.