मर्डर मिस्ट्री! डॉक्टरच्या पहिल्या पत्नीने रचला दुसरीच्या हत्येचा कट पण मास्कमुळे तिसरीनेच गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:46 PM2021-08-31T13:46:36+5:302021-08-31T13:50:31+5:30
Crime News : पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे, सीतामढीमध्ये शासकीय परिसरासमोर डॉक्टरांच्या खासगी क्लिनिकमध्ये गोळीबार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलीस तपासात याबाबता आता भयंकर खुलासा करण्यात आला आहे. डॉक्टरची पहिली पत्नी सीमा सिन्हा यांचा हात असल्याचं आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येचा पहिल्या पत्नीने कट रचला होता. मात्र डॉक्टरांच्या दुसऱ्या पत्नीने मास्क (Mask) लावल्याने तिला ओळखता आलं नाही आणि तिसरीच महिला अडकली व तिचा जीव गेला.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या पतीला मिळविण्यासाठी पहिल्या पत्नीने एक प्लॅन केला. डॉक्टर शिवशंकर महतो आपल्या खासगी कारमधून नर्स बबलीसह क्लिनिकमध्ये पोहोचले होते. तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यावेळी डॉक्टरांसोबत दोन महिला नर्स होत्या. दोघांनीही मास्क लावला होता. यामुळे डॉक्टरांची दुसरी पत्नी ओळखणं कठीण झालं. दरम्यान हल्लेखोरांनी ज्या महिलेवर गोळ्या झाडल्या ती महिला ड़ॉक्टरची दुसरी पत्नीच नव्हती.
"बहिणींना माझा चेहरा दाखवू नका, प्रेयसीला अंत्यसंस्कारास बोलवू नका"; 'त्या' सुसाईड नोटने खळबळhttps://t.co/5GW6LhEtKrpic.twitter.com/WdbxK8IAKN
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2021
सात गोळ्या लागल्याने रुग्णालयात नर्स असणाऱ्या बबली पांडेचा जागीच मृत्यू झाला. तर तीन गोळ्या डॉक्टर शिवशंकर महतो यांना लागल्या. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महतो पहिली पत्नी सीमासोबत राहत नव्हते. आपल्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या शबनम नर्ससोबत त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. यामुळे सीमा आणि डॉक्टर यांच्यात सारखे वाद होत होते. त्यांच्यातील वाद पोलिसांत पोहोचला होता. त्यामुळेच डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीने दुसरी पत्नी शबनमला मारण्याचं कारस्थान रचलं.
भाजपा नेत्याला अटक करण्यात पोलिसांना यश; घटनेने खळबळ#BJPhttps://t.co/BMvN3uaB6H
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2021
सीमाने आपल्या एका नातेवाईकांच्या मदतीने शबनमच्या हत्येचा कट रचला. एका शूटरला तब्बल 6 लाखांची सुपारी दिली. हल्लेखोरांना शबनमचा फोटो दाखविण्यात आला होता, मात्र मास्क लावल्यामुळे त्यांना दोन्ही नर्समधून ओळख पटवता आली नाही. पण ऐनवेळी मास्क लावल्यामुळे शबनमची ओळख पटवणं अवघड झालं आणि दुसऱ्याच एक नर्सला गोळी लागली आणि तिचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पहिली पत्नी सीमासह तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! पीडितेने आपल्याला सोडण्यासाठी नराधमांना हात जोडून विनवणी केली पण...; घटनेने खळबळhttps://t.co/x3CYOINRFw
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2021