भयंकर! चेटकीण असल्याच्या संशयातून महिलेची हत्या; 6 वर्षीय लेकाने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 02:16 PM2021-07-08T14:16:22+5:302021-07-08T14:23:59+5:30
Crime News : 6 वर्षीय लेकाने आपल्या आईसोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितल्याने ही घटना उघडकीस आली आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. मात्र याच दरम्यान देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. चेटकीण असल्याच्या संशयातून एका महिलेची हत्या करण्याची आल्याची भयंकर घटना घडली आहे. 6 वर्षीय लेकाने आपल्या आईसोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितल्याने ही घटना उघडकीस आली आहे. झारखंडच्या पलामू-विश्रामपूरमध्ये एका महिलेची मान कापून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला आहे. महिलेच्या सहा वर्षीय मुलाने आपल्या आईसोबत काय झालं याची माहिती पोलिसांना दिली आहे. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, पाच जण अचानक घरात घुसले. त्यांनी आईला बेदम मारहाण करायला सुरुवात केली आणि तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर तिची मान कापली. चिमुकल्याने आरोपींमध्ये आपल्या सख्ख्या काकाचं देखील नाव घेतलं आहे. एक महिन्यापूर्वी शेजारी राहणाऱ्या एका मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून महिलेवर संशय घेतला जात होता. महिलेला काही लोकांनी धमकी देखील दिली होती.
भाऊ की वैरी! संपत्तीसाठी बहिणीला बेदम मारहाण; नात्याला काळीमा फासणारी घटना #crime#Police#Arresthttps://t.co/9UKpfP3lFn
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021
सूरजमनी देवी असं या 40 वर्षीय महिलेचं नाव आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महिला नेहमीप्रमाणे आपला मुलगा आलोकसोबत घरात झोपली होती. त्याचवेळी आलोकने त्याचे काका, शेजारी राहणारी व्यक्ती, निवृत्त मुख्याध्यापकसह पाच जण आपल्या घरी आले आणि आपल्या आईला अंथरूणातून उचलून बाहेर घेऊन गेले. तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही महिला चेटकीण असल्याचा संशय असल्याने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! कमाईच बंद झाल्याने पत्नी संतापली; भावाच्या मदतीने नवऱ्याला बेदम मारहाण केली#Crime#Policehttps://t.co/k6j8ACWPSy
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021
बापरे! लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, पैसे संपल्याने पत्नी आणि मेव्हण्याने बेदम मारलं; पतीचं डोकंच फुटलं
लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हातावरचं पोट असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशातच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली आणि कमाईच साधन नसल्याने जमा केलेले पैसे संपले त्यामुळे एका व्यक्तीला पत्नी आणि मेव्हण्याने बेदम मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत पतीचं डोकं फुटलं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. बिहारच्या छपरा शहरामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये पतीच्या कमाईचं साधन बंद झाल्याने पत्नी नाराज झाली होती. रागाच्या भरात पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने पतीला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये पती गंभीररित्या जखमी झाला असून त्याला त्याच्या भाच्याने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
बापरे! पती-पत्नीत दुरावा आला अन् सासऱ्यासोबत जवळीक वाढली मग झालं असं काही...#Crime#Policehttps://t.co/Bhu1Vug7Hu
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021