भयंकर! महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ रेकॉर्ड करून दिली जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 16:17 IST2021-09-26T16:07:28+5:302021-09-26T16:17:11+5:30

Crime News : एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

Crime News woman constable was gangraped in neemuch after being invited to birthday party | भयंकर! महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ रेकॉर्ड करून दिली जीवे मारण्याची धमकी

भयंकर! महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ रेकॉर्ड करून दिली जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने महिलेचे काही व्हिडीओ रेकॉर्ड करून जीवे मारण्याची धमकीही दिली. महिला क़ॉन्स्टेबलने पाच जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पीडित महिला कॉन्स्टेबल या नीमचच्या रहिवासी आहेत. सध्या त्या इंदूरमध्ये कार्यरत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी फेसबुकवर महिला कॉन्स्टेबलची पवन नावाच्या तरुणाशी सुरुवातीला मैत्री झाली आणि पुढे ही मैत्री अधिक घट्ट झाली. एके दिवशी पवनने महिला कॉन्स्टेबलला वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केलं. जिथे त्याने अन्य आरोपींसह महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याच दरम्यान काही व्हिडीओ देखील रेकॉर्ड केले. हे व्हिडीओ दाखवून महिला कॉन्स्टेबलला धमकावलं, तिच्याकडे एक लाख रुपयांचा मागणी केली. तसेच याबाबत तक्रार केली अथवा कोणाला सांगितलं तर जीवे मारू अशी धमकी देखील महिलेला देण्यात आली. 

"एक लाख दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करू"

महिला कॉन्स्टेबलने आरोपीच्या छळाला कंटाळून अखेर पोलिसांत याबाबत आता तक्रार दाखल केली आहे. पीडितेने आरोपीच्या आईला देखील याची माहिती दिली होती. तेव्हा तिनेही महिलेने धमकी दिली आणि तिने या घटनेबद्दल इतर कोणालाही सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं. तसेच आरोपीच्या नातेवाईकांनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असा दावाही महिलेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पवन आणि त्याच्या आईला अटक केली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! लग्नानंतरही गर्लफ्रेंडने दिला त्रास म्हणून 'त्याने' तिच्याच घरात घेतला गळफास

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लग्नानंतरही गर्लफ्रेंडने त्रास दिला म्हणून तरुणाने तिच्याच घरात गळफास घेतला आहे. राजस्थानच्या बारां शहरात पाच दिवसांपूर्वी एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आता त्याच्या गर्लफ्रेंडला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. राजकुमार असं या तरुणाचं नाव असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

 

Web Title: Crime News woman constable was gangraped in neemuch after being invited to birthday party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.