Crime News: पतीसोबत किरकोळ वादानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या, हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 13:52 IST2022-05-09T13:51:40+5:302022-05-09T13:52:17+5:30
Crime News: बिहारमदील शेखपुरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आणि निवृत्त सर्जन डॉक्टर एम.पी. सिंह यांची कन्या आणि नेत्रतज्ज्ञ डॉक्टर बरखा सोलंकी यांनी आत्महत्या केली आहे.

Crime News: पतीसोबत किरकोळ वादानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या, हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त, धक्कादायक कारण आलं समोर
पाटणा - बिहारमदील शेखपुरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आणि निवृत्त सर्जन डॉक्टर एम.पी. सिंह यांची कन्या आणि नेत्रतज्ज्ञ डॉक्टर बरखा सोलंकी यांनी आत्महत्या केली आहे. बरखा यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. डॉक्टर बरखा सोलंकी रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. बरखा यांनी लव्ह मॅरेज केले होते. तसेच त्यांचे पतीही पेशाने डॉक्टर आहेत.
बरखा ह्या शेखपुरा येथे माहेरी राहत होत्या. तसेच त्यांचे पतीही तिथेच राहायचे. दोन्ही पती पत्नी एकत्र मिळून क्लिनिक चालवत होते. बरखा यांच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये व्यवसायावरून वाद होत होते. हा वाद एवढा वाढला की अखेर डॉक्टर बरखा यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तसेच पोलिसांनी या प्रकरणात यूडी केस दाखल करून तपास सुरू केला आहे. आत्महत्येचं कारण समजलेलं नाही. मात्र पोलीस केसचा उलगडा करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करण्याचे आवाहन करत आहेत.