Crime News: इमारतीच्या तळमजल्यात महिलेचा विनयभंग
By नामदेव भोर | Updated: August 12, 2022 15:49 IST2022-08-12T15:49:09+5:302022-08-12T15:49:50+5:30
Crime News: शहरातील मध्यवर्ती भागातील शरणपूररोडच्या एका इमारतीच्या तळमजल्यात पाणी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा दोघा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे

Crime News: इमारतीच्या तळमजल्यात महिलेचा विनयभंग
- नामदेव भोर
नाशिक - शहरातील मध्यवर्ती भागातील शरणपूररोडच्या एका इमारतीच्या तळमजल्यात पाणी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा दोघा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला सोमवारी (दि.८) तळमजल्यात पाणी घेण्यासाठी जात असताना संशयित आरोपी निरज नारंग व सतबीर कौर नारंग (४६) यांच्या पैकी नीरज नारंग याने पिडितेला जवळ ओढून तिचा विनयभंग केला. नारंगने पिडितेच्या मनास लज्जा निर्माण होणारे वर्तण केले असताना संसशयि सतबीर कौर यांनी पिडितेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे पिडिता हि गोष्ट तिच्या आईला सांगण्यासाठी जोराने आवाज देऊ लागल्याने सतबीर कौर नारंगने पिडितेला जोरदार धक्का देऊन ढकलून दिले.
त्यामुळे पिडितेच्या डाव्या डोळ्याच्या भूवईवर जखम झाली आहे. पिडितेने घडलेला प्रकार गुरुवारी (दि. ११) पोलिसांसमोर कथन करीत दोनही संशयितांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणा तपास करीत आहेत.