इथे ओशाळली माणुसकी! धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार; मदतीऐवजी लोक काढत राहिले Video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:16 PM2021-10-20T18:16:28+5:302021-10-20T18:23:32+5:30

Crime News : धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला असल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

Crime News woman rape in train america riders mobile video | इथे ओशाळली माणुसकी! धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार; मदतीऐवजी लोक काढत राहिले Video

इथे ओशाळली माणुसकी! धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार; मदतीऐवजी लोक काढत राहिले Video

googlenewsNext

महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना अमेरिकेत घडली आहे. एका धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेवर बलात्कार केला जात असताना इतर प्रवाशांनी तिला वाचवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. याउलट काही प्रवाशांनी बलात्काराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. तसेच एकाही प्रवाशाने 911 या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली नाही. 

दक्षिणपूर्व पेन्सिल्वेनिया परिवहन प्राधिकरणाच्या पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा विनयभंग, बलात्कार करण्यात आला तेव्हा ट्रेनमध्ये जवळपास 25 हून अधिक प्रवासी उपस्थित होते. ही धक्कादायक घटना घडत असताना त्यातील एकाही प्रवाशाने 911 या क्रमांकावर संपर्क साधला नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 

40 मिनिटांच्या प्रवासात पीडित महिलेचा विनयभंग आणि बलात्कार

उत्तर फिलाडेल्फिया स्थानकावर महिला आणि एक पुरुष एकाच स्टॉपवर ट्रेनमध्ये चढले होते. या प्रकरणी पोलिसांनी 35 वर्षीय आरोपी फिस्टन नगोय याला अटक केली आहे. आरोपीने 40 मिनिटांच्या प्रवासात पीडित महिलेचा विनयभंग आणि बलात्कार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण याच दरम्यान ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या कोणीही महिलेची मदत करण्यास पुढाकार घेतला नाही. अमेरिकेतील घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News woman rape in train america riders mobile video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.