Crime news : दिराकडूनच महिलेचं 18 वर्षे लैंगिक शोषण, पती म्हणाला भाऊ-भावात हे चालतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 15:15 IST2022-01-13T15:14:49+5:302022-01-13T15:15:55+5:30
पीडित महिलेचा पती सैन्य दलात असून 2003 मध्ये ते कर्तव्यावर असताना दिराने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत, पतीला सांगितल्यानंतर पतीनेही महिलेलाच सुनावले.

Crime news : दिराकडूनच महिलेचं 18 वर्षे लैंगिक शोषण, पती म्हणाला भाऊ-भावात हे चालतं
ग्वालियरमध्ये आपल्या मोठ्या दीराकडून वहिनीवर तब्बल 18 वर्षांपासून सातत्याने बलात्कार होत होता. याबाबत पत्नीने आपल्या पतीकडे तक्रार केली, तर पतीने पत्नीला तोंड बंद ठेवण्यास बजावले. त्यामुळे, पीडित महिलेनं धाडस दाखवत पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यामध्ये, मोठ्या दिराने 2003 मध्ये पहिल्यांदा बलात्कार केला असून गेल्या 18 वर्षांपासून सातत्याने लैंगिक शोषण होत असल्याचे म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी महिलेच्या पतीलाही सहआरोपी करण्यात आले आहे.
पीडित महिलेचा पती सैन्य दलात असून 2003 मध्ये ते कर्तव्यावर असताना दिराने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत, पतीला सांगितल्यानंतर पतीनेही महिलेलाच सुनावले. भावा-भावात हे चालत असते, कुठेही वाच्यता करू नको, अशी समजच पतीने दिल्याचं महिलेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. पीडित 37 वर्षीय महिला थाटीपूर पोलीस ठाणे परिसरातील शांती नगर येथील रहिवाशी आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, पीडित महिलेचा 2003 मध्ये ग्वालियर येथील एका सैनिकासोबत विवाह झाला होता, लग्नावेळी महिला 19 वर्षांची होती. लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या पतीची बॉर्डवर ड्युटी लागली. त्यामुळे, ते सीमेवर ड्युटी करत असताना इकडे त्याच्या भावाने महिलेवर जबरदस्ती केली.
मोठ्या दिराने महिलेवर बलात्कार केला, त्यावेळी पीडितेनं विरोध केला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे, बदनामी होऊ नये, यासाठी महिला गप्प होती. त्याचा गैरफायदा घेत दिराने सातत्याने तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पतीला सांगितल्यावर पतीने काहीतरी मार्ग काढू असे सांगितले. मात्र, पतीला सांगूनही दीराकडून अत्याचार सुरूच असल्याने पुन्हा पतीसमोर गाऱ्हाणे मांडले. मात्र, यावेळी पतीने भावाचे समर्थन केले, तसेच, घरातील गोष्ट घरातच राहू दे, भावा-भावात हे चालतेच, असे म्हटले. त्यामुळे, पीडित महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत आहेत.