धक्कादायक! 'मी माझ्या मर्जीने आत्महत्या करतोय, घरच्यांना...'; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:36 PM2022-02-14T17:36:36+5:302022-02-14T18:25:29+5:30
Crime News : एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.
नवी दिल्ली - राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. बालोतरा इंडस्ट्रियल परिसरातील एका फॅक्ट्रीमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या सात तास आधी तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्याने आपल्या मर्जीने आत्महत्या करत आहे. कृपया घरच्यांना त्रास देऊ नका असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधासर गावाचा निवासी असलेला 20 वर्षीय विशनाराम बालोतरा इंडस्ट्रियल परिसरातील एका कपड्याच्या फॅक्ट्रीमध्ये काम करतो. तरुणाने शनिवारी फॅक्ट्रीमध्येच गळफास घेतला. आत्महत्या करण्याआधी जवळपास सात-आठ तास पहिला त्याने सोशल मीडियावर सुसाईड करत असल्याची एक पोस्ट फॉरवर्ड केली होती. ही पोस्ट कुटुंबीयांनी देखील पाहिली. त्यांनी फोन करून तरुणाला याबाबत विचारलं तेव्हा त्याने सांगितलं. पण कुटुंबीयांना ही मस्करी असल्याचं वाटलं आणि त्यांनी तरुणाकडे दुर्लक्ष केलं.
तरुणाशी त्यानंतर काहीच संपर्क झाला नाही म्हणून कुटुंबीय फॅक्ट्रीमध्ये आले. तेव्हा त्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचवेळी नातेवाईकांनी सोशल मीडियावर तरुणाने आत्महत्येआधी एक पोस्ट फॉरवर्ड केल्याचं सांगितलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
"मी आत्महत्या करत आहे. यामध्ये कोणाचाच दोष नाही. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. कृपया माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. माझ्या तीन भावांची जोडी तशीच कायम असूदे. ओके बाय" असं तरुणाने आत्महत्येआधी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. तसेच तरुणाच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.