Crime News : येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने केला आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:वर झाडून घेतली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 10:28 AM2022-02-27T10:28:02+5:302022-02-27T10:41:44+5:30

Crime News: येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने आज पहाटे स्वत: वर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अमोल माने असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. अमोल माने यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Crime News: Yerawada jail police constable attempts suicide, shoots himself | Crime News : येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने केला आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:वर झाडून घेतली गोळी

Crime News : येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने केला आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:वर झाडून घेतली गोळी

googlenewsNext

पुणे - येरवडा कारागृहातील पोलीस शिपायाने आज पहाटे स्वत: वर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अमोल माने असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. अमोल माने यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक कारणावरुन त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने हे येरवडा कारागृहात पोलीस शिपाई  म्हणून कार्यरत आहेत. त्यांना काल गार्ड ड्युटी होती. पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील सरकारी रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. हा प्रकार समजताच त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजल्यावर कारागृहातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी तसेच ससून रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. 

अमोल माने यांनी स्वत: कडील एसएलआर रायफलमधून डाव्या डोळ्याच्या वर कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडून घेतली आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. अमोल माने हे मुळचे अहमदनगरमधील राहणारे आहेत. ते २०१५ मध्ये कारागृह पोलीस म्हणून भरती झाले आहेत. सध्या ते येरवडा कारागृह वसाहतीत राहत आहेत.

Web Title: Crime News: Yerawada jail police constable attempts suicide, shoots himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.