Crime News: बायकोपेक्षाही ‘हॉट’ दिसतेस! नराधमाने अल्पवयीन मुलीचा केला पाठलाग; विनयभंगाचा गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: January 15, 2023 13:54 IST2023-01-15T13:54:13+5:302023-01-15T13:54:50+5:30
Crime News: बायकोपेक्षाही हॉट दिसतेस, असे म्हणून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास कुऱ्हा बसस्टॉपवर ही घटना घडली.

Crime News: बायकोपेक्षाही ‘हॉट’ दिसतेस! नराधमाने अल्पवयीन मुलीचा केला पाठलाग; विनयभंगाचा गुन्हा दाखल
अमरावती - बायकोपेक्षाही हॉट दिसतेस, असे म्हणून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास कुऱ्हा बसस्टॉपवर ही घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपी पवन मोहन बडेरे (३२, मारडा, ता. तिवसा) याच्याविरूध्द विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तिवसा तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेली १५ वर्षीय मुलगी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ट्युशन संपवून घरी जाण्याकरीता बसली असताना आरोपीने तिची छेड काढली. तुझे चुंबन घ्यावेसे वाटते, असे म्हणून तिच्या सोबत लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे ती भेदरली. घरी आल्यानंतर तिने पालकांकडे आपबिती कथन केली. अखेर १४ जानेवारी रोजी तीने पालकांसमवेत कुऱ्हा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदविला.
शाळकरी विद्यार्थीनीचे बळजबरीने चुंबन
धारणी: तालुक्यातील एका गावातील रहिवासी तथा आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचे बळजबरीने चुंबन घेऊन पाठलाग केल्याची घटना एका शाळेशेजारी घडली. ती अल्पवयीन मुलगी शाळेत ये जा करताना आरोपी मोहम्मद रेहान मो. अजीज (२४, कुसुमकोट) हा तिच्याकडे पाहून हसतो. जुलै २०२२ पासून त्याने तिचा पाठलाग चालविला असून, तो तिच्याशी दरडावून, धमकीच्या सुरात बोलतो. मॅसेज देखील करतो. अलिकडे त्याने स्वत:ला संपविण्याची धमकी तिला दिली. तो त्रास असह्य झाल्याने १३ जानेवारी रोजी सायंकाळी तिने त्याच्याविरूद्ध तक्रार नोंदविली. धारणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मो. रेहानविरूध्द विनयभंग व पॉस्को अन्वये गुन्हा दाखल केला.