बापरे! ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला, तब्बल 10 लाख हारला; उचललं टोकाचं पाऊल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 02:19 PM2021-11-02T14:19:01+5:302021-11-02T14:29:13+5:30

Crime News : ऑनलाईन गेममुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे.

Crime News young man lost rs 10 lakh in online game committed suicide after getting upset | बापरे! ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला, तब्बल 10 लाख हारला; उचललं टोकाचं पाऊल अन्...

बापरे! ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला, तब्बल 10 लाख हारला; उचललं टोकाचं पाऊल अन्...

googlenewsNext

नवी दिल्ली - ऑनलाईन गेम खेळण्याचं अनेकांना वेड असतं. पण हाच नाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन गेममुळे (online game) एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणावर लाखोंचं कर्ज झालं होतं. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाला मोबाईलवर तीन पत्ती खेळण्याचं व्यसन होतं. यामध्येच तो तब्बल दहा लाख हारला होता. 

राजगडमधील एका गावात ही घटना घडली. येथे राहणारा विनोद दांगी याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदला ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. यामध्ये तो तब्बल 10 लाख रुपये हरला होता. यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून निराश झाला होता. स्थानिकांनी रेल्वे ट्रकवर त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

तब्बल 10 लाख रुपये हरला

विनोदच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून विनोद ऑनलाईन तीन पत्ती गेम खेळत होता. त्यात तो तब्बल 10 लाख रुपये हरला होता. विनोद गेम खेळण्यासाठी आजूबाजूच्या व्यापाऱ्यांकडून दुकानदारांकडून पैसे उधार घेत होता. तो आपल्या दुकानात बसून दिवसभर गेम खेळत होता. विनोद विवाहित असून त्याला दोन मिलं आहे. याआधी देखील त्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यावेळी घरच्यांनी त्याला वाचवलं होतं. 

ऑनलाईन गेममुळे 3 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला

विनोद आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन बहिणी आहेत. त्याला ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. कुटुंबीयांनी अनेकदा त्याला समज दिली होती. पण त्याने ऐकलं नाही. त्याचं हे गेम खेळण्याचं व्यसन दिवसागणिक वाढत होतं. यामध्येच तो 10 लाख रुपये हरला. त्यानंतर तो उदास आणि शांत राहू लागला होता. त्याला कर्ज फेडण्याची चिंता लागली होती. एकेदिवशी तो अचानक घरातून गायब झाला. यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Read in English

Web Title: Crime News young man lost rs 10 lakh in online game committed suicide after getting upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.