भयावह! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहून स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लीटर पेट्रोल ओतून घेतलं जाळून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 02:17 PM2022-08-13T14:17:57+5:302022-08-13T14:21:09+5:30

Crime News : अरुंधती हा एक हॉरर चित्रपट आहे. तरुणाने हा चित्रपट तब्बल 15 वेळा पाहिला आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम झाला.

Crime News young man set himself on fire after watching movie arundhati | भयावह! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहून स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लीटर पेट्रोल ओतून घेतलं जाळून

भयावह! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहून स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लीटर पेट्रोल ओतून घेतलं जाळून

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. अरुंधती हा चित्रपट पाहून एका 23 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. कर्नाटकातील टुमकारू जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एक तरुण अरुंधती चित्रपटाची कॉपी करत होता. अरुंधती हा एक तेलुगू हॉरर चित्रपट आहे. तरुणाने हा चित्रपट तब्बल 15 वेळा पाहिला आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम झाला. चित्रपटाच्या नादात त्याने अकरावीनंतरचे शिक्षणही सोडले. 

रेणुका प्रसाद असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अभ्यासात खूप हुशार होता आणि नेहमी त्याच्या वर्गात पहिला क्रमांक पटकवायचा. त्याला या चित्रपटाचे इतके व्यसन लागले की त्याने आपले शिक्षणही सोडले. घरच्यांनी त्याला चित्रपट पाहण्यास मनाई देखील केली. पण, त्याने ऐकलं नाही. हा तरुण त्याच्या कुटुंबीयांशी चित्रपटाची कॉपी करण्याबाबत बोलायचा. मात्र, घरच्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तरुणाने चित्रपटातील एक दृश्य कॉपी करण्याचा प्रयत्न केला. 

चित्रपटाच्या नायकाप्रमाणेच रेणुका प्रसादने बुधवारी गावाच्या बाहेरील भागात सुमारे 20 लीटर पेट्रोल अंगावर ओतलं आणि स्वत:ला पेटवून घेतलं. रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी त्याला जळत असलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो जवळपास ६० टक्के भाजला होता. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोडिगेनहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. रेणुका प्रसाद याच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रेणुका प्रसादच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने चांगला अभ्यास करावा आणि चांगले करिअर करावे अशी त्यांची इच्छा होती. दुर्दैवाने सिनेमाच्या व्यसनाने त्याचा जीव घेतला. तेलुगू सुपरहिट चित्रपट 'अरुंधती'मध्ये अभिनेत्री स्वतःच्या इच्छेनुसार मरते आणि शत्रूचा बदला घेण्यासाठी तिचा पुनर्जन्म होतो. या चित्रपटापासून प्रेरित होऊन रेणुका प्रसाद याने त्याच्या इच्छेनुसार स्वत:ला जाळले, कारण त्यालाही पुनर्जन्म घ्यायचा होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेय 
 

Web Title: Crime News young man set himself on fire after watching movie arundhati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.