धक्कादायक ! तरुणीने कुटुंबातील १३ जणांची विष देऊन केली हत्या; कारण ऐकून धक्काच बसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:00 PM2024-10-07T13:00:18+5:302024-10-07T13:02:42+5:30
Crime News : एका तरुणीने आपल्याच कुटुंबियांची विष देऊन हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Crime News : एका तरुणीने आपल्याच कुटुंबातील १३ जणांची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे, ही घटना पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. या प्रकरणी एका तरुणीला अटक केली आहे. अन्नामध्ये विषारी पदार्थ मिसळून आपल्या कुटुंबातील १३ जणांची हत्या केल्याचा तरुणीवर आरोप आहे.
मिळालेली माहिती अशी, या घटने प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. मुलीचे कुटुंबीय तिच्या इच्छेनुसार लग्न करण्यास तयार नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी खैरपूर येथील देल हैबत खान ब्रोही गावाजवळ रोझीचा मृत्यू झाला. आई-वडील यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना विष देण्याचा कट तिने रचल्याचे उघड झाले आहे.
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, "जेवण खाल्ल्यानंतर सर्व १३ सदस्य आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे सर्वांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन केले असता, विषारी अन्न प्राशन केल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी सखोल तपास केला असता, मुलगी आणि तिच्या प्रियकराने घरात रोटी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गव्हात विष मिसळल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रविवारी पोलिसांनी तरुणीला अटक केली.
१९ ऑगस्ट रोजी घरी जेवल्यानंतर आजारी पडून कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी चार जणांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मृत्यूचे कारण काहीतरी गूढ आजार किंवा अन्न विषबाधा आहे. मात्र, खैरपूरचे एसएसपी समिउल्ला सोमरो यांच्या सूचनेवरून पोलिसांनी वेगवेगळ्या कोनातून तपास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. डीएसपी म्हणाले की, पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टम अहवाल मिळवले आणि कोणत्या प्रकारच्या विषारी पदार्थामुळे इतके मृत्यू झाले हे शोधण्यासाठी त्यावर काम केले. तपासादरम्यान पीडितांनी खाल्लेल्या अन्नात विष मिसळल्याचे समोर आले.
मुलीनेच लग्नासाठी आपल्याच कुटुंबियांची हत्या केल्याचे समोर आले.