Crime News: मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे प्रलाेभन दाखवून तरुणाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:58 AM2022-06-20T10:58:40+5:302022-06-20T10:59:07+5:30
Crime News: मुंबई महापालिकेत नोकरी लावताे असे सांगून नियुक्तीचे बनावटपत्र देऊन २२ वर्षीय तरुणाची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अंजली राजाराम मुनेश्वर हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर : मुंबई महापालिकेत नोकरी लावताे असे सांगून नियुक्तीचे बनावटपत्र देऊन २२ वर्षीय तरुणाची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अंजली राजाराम मुनेश्वर हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने अन्य काेणाला फसविले काय? याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर मराठा सेक्शन परिसरात राहणारी अंजली हिने आशेळेगावात राहणाऱ्या गिरीश पवार व त्याचा चुलत भाऊ जगदीश पवार यांना संदीप बाविस्कर नावाची व्यक्ती मुंबई महापालिकेत नोकरी लावू शकते, असे सांगितले. ६ एप्रिल २०२१ ते २४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान त्यांना बनावट नियुक्तीपत्र देऊन गुगल पेद्वारे व वेगवेगळ्या बँक खात्यांत आठ लाख रुपये घेतले.
नियुक्तीपत्रावर मुंबई महापालिकेचे खोटे शिक्के व खोटी सही हाेती. हे पत्र घेऊन गिरीश मुंबई पालिकेच्या कार्यालयात गेला असता ते बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गिरीश याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पाेलिसांनी अंजली मुनेश्वर हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून या महिलेने आणखी कुणाला फसविले आहे का याचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.