धक्कादायक! "पोलीस अधिकारी पैशांसाठी मला त्रास देतोय"; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:44 PM2022-06-13T14:44:51+5:302022-06-13T14:46:38+5:30
Crime News : पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवलं आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अशोकनगरमध्ये एका तरुणाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवलं आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी एक कागद सापडला आणि हातावरही काहीतरी लिहिलं होतं. पोलिसांनी सुसाईड नोट पाहिल्यानंतर तपास सुरू केला आहे. एएसआय पैशांसाठी त्रास देत होता असं तरुणाने म्हटलं होतं,
मिळालेल्या माहितीनुसार, अशोकनगरच्या त्रिलोकपुरी कॉलनीत राहणाऱ्या 26 वर्षीय भूपेंद्र महेंद्र दांगीने ट्रेनच्या समोर आत्महत्या केली. भूपेंद्र काही दिवसांपासून एका डॉक्टरकडे ड्रायव्हरचं काम करत होता. मात्र अचानक मजुरीचं काम करू लागला. भूपेंद्रचा मोठा भाऊ राजू दांगीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी भूपेंद्र मजुरी करण्यासाठी घराबाहेर पडला. यानंतर ASI विनोद तिवारीने त्याला पकडून मारहाण केली.
भूपेंद्रने सर्वात लहान भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्याला पोलिसांकडून त्रास होत असल्याने आत्महत्या करीत असल्याचं सांगितलं. राजू यांनी एएसआय विनोद तिवारी याने माझा भाऊ भूपेंद्र याला यापूर्वीही अनेकदा पकडून वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली आहे. या चर्चेनंतर भूपेंद्र रात्री घरी परतलाच नाही. पहाटे चारच्या सुमारास त्रिलोकपुरी कॉलनीतच भूपेंद्रचा मृतदेह रेल्वे रुळावर पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शेवटी त्याने आत्महत्या केली आहे.
भूपेंद्रजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यात त्याने एएसआय विनोद तिवारी यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे. मृताने हातावर लिहिलेली सुसाईड नोट आणि एक कागदही ठेवला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, एएसआय त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता, या चिंतेने आत्महत्या करत आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.