Crime News: सेवेतून बडतर्फ पोलिसाने मुलीला हुंड्यात दिले सव्वा कोटी रुपये, लग्नाच्या पार्टीत झाले कोरोना नियमांचे उल्लंघन    

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:10 PM2022-01-25T17:10:52+5:302022-01-25T17:11:34+5:30

Crime News: मुलीच्या विवाह सोहळ्यामध्ये सदर बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने लग्नात तब्बल सव्वा कोटी रुपयांचा हुंडा दिल्याचे वृत्त आहे. तसेच या शाही विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Crime News:Royal wedding of a sacked policeman's daughter, gave 1.25 crore Cash in dowry | Crime News: सेवेतून बडतर्फ पोलिसाने मुलीला हुंड्यात दिले सव्वा कोटी रुपये, लग्नाच्या पार्टीत झाले कोरोना नियमांचे उल्लंघन    

Crime News: सेवेतून बडतर्फ पोलिसाने मुलीला हुंड्यात दिले सव्वा कोटी रुपये, लग्नाच्या पार्टीत झाले कोरोना नियमांचे उल्लंघन    

Next

जयपूर - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उच्चैन येथे एका सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे. कोरोनाचे सर्व नियम धुडकावून हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये स्थानिक आमदार आणि स्थानिक नेतेमंडळींसह अनेक प्रतिष्ठित लोक सहभागी झाले होते. दरम्यान, या विवाह सोहळ्यामध्ये सदर बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने लग्नात तब्बल सव्वा कोटी रुपयांचा हुंडा दिल्याचे वृत्त आहे. तसेच या शाही विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पोलीस अधिकारी असलेल्या अर्जुन सिंह याला लाचखोरी आणि बेफिकीरी प्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. याच पोलीस अधिकाऱ्याने मुलीचे लग्न अगदी थाटामाटात लावून दिले. लग्नाला शेकडो लोक उपस्थित होते. तसेच या लग्नसोहळ्यामध्ये अर्जुन सिंह याने मुलीला तब्बल सव्वा कोटी रुपयांचा हुंडा दिला. या प्रकरणी आता जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला आहे.

या प्रकरणी भरतपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याविरोधातील संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू आहे. त्याने कोट्यवधी रुपये मुलीला लग्नामध्ये दिल्याची तक्रार आली आहे.  या प्रकरणाची चौकशी होणार आहे. तसेच कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.   
 

Web Title: Crime News:Royal wedding of a sacked policeman's daughter, gave 1.25 crore Cash in dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.