मीरारोड मध्ये आणखी एका रिक्षा चालकास गुंगी देऊन लुटल्याचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:33 PM2023-03-21T21:33:05+5:302023-03-21T21:33:12+5:30
मीरारोड मध्ये रिक्षा चालकास गुंगीचे औषध देऊन दोघांनी लुटल्याचा आणखी एक गुन्हा सोमवारी नया नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे
मीरारोड -
मीरारोड मध्ये रिक्षा चालकास गुंगीचे औषध देऊन दोघांनी लुटल्याचा आणखी एक गुन्हा सोमवारी नया नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे . त्यामुळे शहरात गुंगीचे औषध देऊन लुटणारी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे .
बोरिवली पूर्वेच्या काटर रॉड भागात राहणारे राजेंद्र यादव हे ह्या रिक्षा चालकांनी बोरिवली पश्चिमेस स्वामी विवेकानंद मार्गावरून दोन प्रवाश्यांचे भाडे घेतले . मीरारोडच्या अय्यप्पा मंदिर येथे दर्श घेऊन परत यायचे असे त्या दोघांनी सांगितले .
दुपारी मीरारोड येथे आल्यावर मंदिर बंद असल्याचे समजले . एकाने जाऊन दोन फ्रुटी आणल्या व एक रिक्षाचालकास आणि दुसरी सहकार्यास दिली . फ्रुटी थोडीशी प्यायले असता बेचव लागली म्हणून यादव यांनी टाकून दिली . मात्र काही वेळाने त्यांना गुंगी आली आणि त्या दोघं प्रवाश्यांनी यादव यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची ५० हजार किमतीची चैन लुटून पळून गेले . याप्रकरणी नयानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आधी बोरिवलीच्या सुनील जाधव ह्या रिक्षा चालकास सृष्टी भागात आणून मंदिराचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध देऊन गळ्यातील चैन व रोख लुटल्याचा गुन्हा १९ मार्च रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे . दोन्ही गुन्ह्यात २ आरोपी असून त्यांनी बोरिवली वरून रिक्षाचे भाडे घेऊन मीरारोड भागात आले रिक्षा चालकांच्या गळ्यातील चैन लुटल्या.