कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविल्याने एकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 10:03 PM2020-03-31T22:03:44+5:302020-03-31T22:04:35+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेख याच्यावर कलम 188 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Crime on one by spreading rumors on social media about Corona virus pda | कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविल्याने एकावर गुन्हा

कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविल्याने एकावर गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देशेख याने 29 मार्च रोजी "मुकुंदनगर फकीरवाडा भाग मिल्ट्रीच्या हातात देणार" अशा संदर्भातील मेसेज एका व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केला होता. खोटं मेसेज टाकून अफवा पसरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघनमुकुंदनगर येथील एकावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल

अहमदनगर: कोरोना साथीच्या संदर्भात व्हाट्सअपवर खोटा मेसेज टाकून अफवा पसरविल्याप्रकरणी मुकुंदनगर येथील एकावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताहीर शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शेख याने 29 मार्च रोजी "मुकुंदनगर फकीरवाडा भाग मिल्ट्रीच्या हातात देणार" अशा संदर्भातील मेसेज एका व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केला होता. खोटं मेसेज टाकून अफवा पसरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेख याच्यावर कलम 188 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोना संदर्भात सोशल मीडिया अथवा इतर माध्यमांद्वारे खोटे मेसेज टाकून अफवा पसरवली तर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Web Title: Crime on one by spreading rumors on social media about Corona virus pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.