अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:59 AM2021-05-22T09:59:36+5:302021-05-22T09:59:58+5:30

२७ एप्रिल २०२१ रोजी आईचे निधन झाल्याचे सांगून तिच्याकडून ५० हजार रुपये घेत तो नॉट रिचेबल झाला

The crime of rape against the actress's bodyguard; Accused of cheating by showing the lure of marriage | अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप

अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप

Next

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून नेहमीच चर्चेत असलेल्या सिनेअभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार हेगडे (३३) असे त्याचे नाव असून, डी. एन. नगर पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार तरुणी अंधेरी परिसरात राहण्यास असून ब्युटीशियन आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आठ वर्षांपूर्वी तिची हेगडे सोबत ओळख झाली. अशात, बॉलिवूडमध्ये पर्सनल बॉडीगार्ड म्हणून काम करतो. गेल्या वर्षी जून महिन्यात त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले, ते दोघेही एकाच क्षेत्रात काम करत होते. दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. आपण लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून त्याने तिच्यावर अनेकदा नैसगिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. 

पुढे त्याने, टाळाटाळ सुरू केली. २७ एप्रिल २०२१ रोजी आईचे निधन झाल्याचे सांगून तिच्याकडून ५० हजार रुपये घेत तो नॉट रिचेबल झाला. दरम्यान त्याच्या एका मित्राने कुमार सध्या जेलमध्ये असल्याचे सांगितले, त्यानंतर काही वेळाने तिला अन्य एका महिलेचा फोन आला, तिने ती कुमारची आई असल्याचे सांगितले. ते दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने ती त्याचे लग्न दुसऱ्या तरुणीसोबत लावून देणार असल्याचे तिने सांगितल्यामुळे तरुणीला मानसिक धक्का बसला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने बुधवारी डी. एन. नगर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्यांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: The crime of rape against the actress's bodyguard; Accused of cheating by showing the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस