रिक्षा पार्किंगवरून हाणामारी : १८ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:55 PM2019-09-05T17:55:04+5:302019-09-05T17:56:32+5:30
पोलिसांनी बेकायदा जमाव जमविणे, हाणामारी करणे, शिवीगाळ करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला.
पिंपरी : रिक्षा पार्क करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक करत परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना पिंपरीतील विठ्ठलनगर येथे घडली.
लक्ष्मी रामस्वामी अलकुंटे (वय ३२, रा़ विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, व्यंकटेश देवकर (वय ५०), रवींद्र लक्ष्मण टाकळे (वय ४०), राजू कुऱ्हाडे , सुवर्णा सतीश लष्करे, शांताबाई कुऱ्हाडे , भीमाबाई टाकळे, रमाबाई कुऱ्हाडे, मयूरी कुऱ्हाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
याच्या परस्पर विरोधात रवींद्र लक्ष्मण टाकळे (वय ३६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, साहिल पवार (वय २२), अक्षय भीमसिंग देवकर ऊर्फ बालक ( वय ३०), बालाजी अलकुंटे (वय ४०), सागर कुºहाडे (वय २२), सागर लष्करे (वय २८), बंटी देवकर (वय ३०), मिरेकर (वय २८), संजय पवार (वय ५०), अशोक हनुमंता देवकर (वय ४२) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. दोन्ही बाजूच्या एकूण १८ आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना जामिनावर सोडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन्ही कुटुंबामध्ये रिक्षा पार्किंग करण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. यामुळे पोलिसांनी बेकायदा जमाव जमविणे, हाणामारी करणे, शिवीगाळ करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.