इंदापूर येथे महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 08:40 PM2019-06-26T20:40:34+5:302019-06-26T20:42:20+5:30

लोणी देवकर येथील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला तीन जण वारंवार शरीरसुखाची मागणी करत त्रास देत होते.

crime registred against three persons with atrociti act due to molestation of women in indapur | इंदापूर येथे महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल 

इंदापूर येथे महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल 

Next

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील २७ वर्षीय महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शनिवार ( दि. २२) रोजी तीन जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी देवकर येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला वरकुटे बुद्रुक येथील तीन जण वारंवार शरीरसुखाची मागणी करत त्रास देत होते. तसेच तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तिने सर्व प्रकार तिच्या पतीस सांगितला. १४ जून रोजी त्या तिघांना जाब विचारण्यासाठी तिचा पती गेला असता त्याला त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली.

आरोपी अशोक सर्जेराव पवार, अशोक गोरख शिंदे, शहाजी भिमराव शिंदे ( तिघेही रा. वरकुटे बुद्रुक ता. इंदापूर ) यांच्याविरुद्ध महिलेने इंदापूर पोलीस ठाण्यात दि. २२ जून रोजी फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे वरील तिन्ही आरोपींविरुध्द अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर करीत आहेत. 
____________________________________________

Web Title: crime registred against three persons with atrociti act due to molestation of women in indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.