लॉकडाऊनंतर नाशकात गुन्हेगारी  ‘अनलॉक’; गुन्ह्यांचा आलेख उंचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:54 PM2020-06-27T22:54:31+5:302020-06-27T23:03:29+5:30

चालू महिन्याअखेर नाशकात 2 खून झाले. तर घरफोडयांचे प्रमाणही वाढल्याने नाशकात गुन्हेगार सक्रिय झाले असून ते पोलीस दलाला खुले आव्हान देत आहेत.

Crime 'unlocked' in Nashik after lockdown; The crime graph going up | लॉकडाऊनंतर नाशकात गुन्हेगारी  ‘अनलॉक’; गुन्ह्यांचा आलेख उंचावला

लॉकडाऊनंतर नाशकात गुन्हेगारी  ‘अनलॉक’; गुन्ह्यांचा आलेख उंचावला

Next
ठळक मुद्दे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा राज्यापाठोपाठ केंद्र सरकारकडून केली गेली आणि नागरिक आपआपल्या घरात बंदिस्त झाले.लॉकडाऊनसह पोलिसांची गस्तही शिथिल झाल्याने गुन्हेगारांवरील वचक संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

नाशिक : कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. सरकारकडून पुन्हा जनजीवन पुर्वपदावर आणले जात असताना नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मे महिन्यापासून गुन्हेगारीसुध्दा ‘अनलॉक’ झाल्याचे दिसून येते. एप्रिलच्या तुलनेत गेल्या महिन्यात गुन्हेगारीचा आलेख चांगलाच उंचावला. चालू महिन्याअखेर नाशकात 2 खून झाले. तर घरफोडयांचे प्रमाणही वाढल्याने नाशकात गुन्हेगार सक्रिय झाले असून ते पोलीस दलाला खुले आव्हान देत आहेत.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा राज्यापाठोपाठ केंद्र सरकारकडून केली गेली आणि नागरिक आपआपल्या घरात बंदिस्त झाले. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला, गजबजणाऱ्या बाजारपेठा ओस पडल्या सर्व व्यवहार ठप्प झाले आणि सर्वत्र ‘लॉकडाऊन’ दिसून आले. यामुळे हळुहळु मार्च व एप्रिलमध्ये घात, अपघातासोबत अन्यप्रकारची गुन्हेगारीसुध्दा ‘लॉक’ झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत होते. या लॉकडाऊनच्या काळात शहर गुन्हे शाखेने काही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्यासुध्दा बांधल्या; मात्र जेव्हापासून अनलॉकची घोषणा झाली आणि राज्यात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरूवात झाली, तेव्हापासून पुन्हा गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. लॉकडाऊनसह पोलिसांची गस्तही शिथिल झाल्याने गुन्हेगारांवरील वचक संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.


एप्रिलमध्ये शहरात तीन प्राणघातक हल्ले झाले तर मे महिन्यात या प्रकाराचे नऊ गुन्हे घडले. शहरात एप्रिलमध्ये दोनवेळ जबरी चोरीचा गुन्हा घडला तर मे महिन्यात १० जबरी चोरीचे गुन्हे घडले. घरफोड्यांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये आणि अनलॉकमध्ये सारखेच राहिल्याचे दिसते. तसेच अपहरणाचे प्रकार आणि रस्ते अपघाताच्या दुर्घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसते. चालू महिन्याच्या पंधरवड्यातसुध्दा हाणामारी, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, वाहनचोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. तसेच वाहनांची जाळपोळ, तोडफोड, दंगलीसारखे गुन्हेसुध्दा घडले आहेत. जाखोरीमध्ये तर पतीने पत्नीची कोयत्याने हत्त्या केल्याचे उघडकीस आले.

पोलीस गस्तीचा होता धाक
नाशिक शहरात लॉकडाऊन काळात सातत्याने पोलिसांची गस्त सुरू होती. पोलिस वाहनांच्या उद्घोषणा सुरू होत्या. यामुळे पोलिसांचा धाक निर्माण झाला होता; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पोलिस गस्तीचे प्रमाणही कमी झाले; यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. २४ तास शहरातील रस्त्यांवर पोलीस दिसत होते. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि पोलीस नजरेस पडत असल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसला होता. मात्र लॉकडाऊन उठविल्यानंतर नाशिक शहरात गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले आहेत. जून महिन्यात घरफोडी, लूटमार, खून, वाहन चोरी अशा सगळ्याच गुन्ह्यांचा आलेख चढता असल्याचे दिसून आले.

महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
लॉकडाऊन काळात अन्य गुन्ह्यांचे प्रमाण जरी घटले असले तरी महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला. लॉकडाऊनमध्ये १९ विनयभंगाच्या तर १० बलात्काराच्या घटना आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या. तसेच अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे १० प्रकार समोर आले.
 

एप्रिल - एकुण गुन्हे - ८४: प्राणघातक हल्ला-३, जबरी चोरी-२, हाणामारी-८, अपघात-३

मे- एकुण गुन्हे- २३४ : प्राणघातक हल्ला - ९, जबरी चोरी-१०, हाणामारी- १८, अपघात-१४

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

 

Coronavirus News : कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या

 

 

Web Title: Crime 'unlocked' in Nashik after lockdown; The crime graph going up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.