सराईत गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 10:43 PM2020-06-07T22:43:43+5:302020-06-07T22:44:16+5:30
रेकॉर्डवरील आरोपीने ठाण्यात येऊन स्वत:च धारदार पट्टीने हातावर सपासप वार करुन उपचाराच्या १० गोळ्या सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली.
जळगाव - पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सागर महारु सपकाळे (२९, रा.प्रजापत नगर) याने रविवारी दुपारी साडे तीन वाजता शनी पेठ पोलीस ठाण्यात येऊन स्वत:च धारदार पट्टीने हातावर सपासप वार करुन उपचाराच्या १० गोळ्या सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली होती. सपकाळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. रविवारी दुपारी पावणे तीन वाजता तो शनी पेठ पोलीस ठाण्यात आला असता सिध्दार्थ बैसाणे हे ठाणे अमलदार म्हणून कार्यरत होते तर सहायक फौजदार किरण पाठक, धनंजय येवले, संदीप माने, रमेश येउलकर, होमगार्ड सर्फराज पिंजारी व सुजाता ठाकूर असे पोलीस ठाण्यात हजर असताना सागर याने सिध्दार्थ बैसाणे यांच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे दिले नाहीत तर मी माझ्या हातापायास पट्टी मारुन घेईल व तुमचे नाव कोर्टात तसेच वरिष्ठ अधिकाºयांना सांगेल असे धमकावू लागला. यावेळी बैसाणे व इतर सहकाºयांनी त्याची समजूत घालून घरी रवाना केले. त्यानंतर तो पुन्हा साडे तीन वाजता आला व पैसे देत नसल्याने औषधोपचाराच्या ८ ते १० गोळ्या सेवन करुन धारदार पट्टीने स्वत:च्या हातावर पट्टीने वार केले. यावेळी प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने कर्मचाºयांची एकच धावपळ उडाली.
उपचारास दिला नकार
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात नेले, मात्र त्याने तेथे उपचारास व दाखल होण्यास नकार दिला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. सिध्दार्थ बैसाणे यांच्या फिर्यादीवरुन सागर याच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याने याआधी देखील पोलीस ठाण्यात येऊन कर्मचाºयांकडे पैशाची मागणी केली आहे, पैसे दिले नाहीत तर स्वत:च्या अंगावर वार केलेले आहेत. दोन दिवसापूर्वी देखील त्याने पोलीस ठाण्यात येऊन असाच प्रकार केला होता.