जानूझ प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 09:13 PM2018-10-01T21:13:54+5:302018-10-01T21:14:34+5:30
तपास काम क्राईम ब्रँचकडे सोपविण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याकडे रविवारी मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी तसा आदेश महासंचालकांनी जारी केला आहे. या प्रकरणाचा तपास निरीक्षक राहूल परब यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
पणजी - गोमेकॉतील शवागारातून गायब झालेल्या जानूझ गोन्साल्वीस यांच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा तपास शेवटी पोलीस खात्याने गुन्हा अन्वेषण विभागाकडे (क्राईम ब्रँच) सोपविला. सोमवारी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी असा आदेश जारी केला.
तपास काम क्राईम ब्रँचकडे सोपविण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याकडे रविवारी मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी तसा आदेश महासंचालकांनी जारी केला आहे. या प्रकरणाचा तपास निरीक्षक राहूल परब यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी शवागरात राखून ठेवलेल्या जानूझच्या मृतदेहाची फॉरेन्सीक विभागाच्या अधिकाºयाच्या निष्काळजीपणामुळे विल्हेवाट लावली गेल्यामुळे जानूझच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. या प्रकरणात जानूझच्या भावाकडून आणि नंतर गोमेकॉ प्रशसनाकडूनही अगशी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणात गोमेकॉच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख एडमंड रॉड्रिगीश व इतर दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध आगशी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यातही आला होता. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून प्रकरण ज्येष्ठ अधिकाऱ्याकडेच देण्यात यावे असा आरोग्य मंत्र्यांचा आग्रह होता. त्यामुळेच ते क्राईम ब्रँचला सोपविण्यात आले आहे.