आर्थिक वादातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:29 PM2019-09-04T15:29:02+5:302019-09-04T17:13:54+5:30
पैसे डबल करण्याच्या आमिषाने दोन दिवसापूर्वी पूर्वी खेडमध्ये तरुणावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती.
दावडी : पैसे डबल करण्याच्या आमिषाने दोन दिवसापूर्वी पूर्वी खेडमध्ये तरुणावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास कोणी तयार नव्हते. मात्र, खेड पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवत ४८ तासात गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.
निलेश भास्कर टिळे (रा. रावेत, पिंपरी चिंचवड ) या तीस वर्षाच्या युवकावर गोळीबार करुन गंभीर केले असल्याची घटना कडूसकडे जाणाऱ्या वडगाव पाटोळे गावाच्या हद्दीत रविवारी (दि. ३१ ) घडली होती. निलेश यांच्यावर कशामुळे प्राणघातक हल्ला झाला. मात्र जखमी निलेश टिळे व त्याचे वडील भास्कर टिळे यांनी पोलिस फिर्याद देण्यास नकार दिला होता.ही घटना कशावरून घडली.
याबाबत पोलीस यंत्रणाही ही संभ्रमात होती. याबाबत तक्रार देण्यास कोणीही पुढे आले नाही. मात्र, खेड पोलिसांनी तपासांची चक्रे फिरवत ३ आरोपीना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश विठ्ठल घनवट (वय २७ ( रा.अंधेरी सातबंगला मुंबई रामदास गबाजी शिंदे (वय २७ रा.गडद ता.खेड) यांनी समिर सुरेश रेटवडे (रा.रेटवडी ता.खेड ) याच्या मदतीने कट रचुन बेकायदा बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून दहा लाख रूपयाचे वीस लाख रुपये करून देतो. असे निलेश भास्कर टिळे (रा. रावेत, पिंपरी चिंचवड ) यास अमिष देऊन व बहाना करून समीर रेटवडे यांच्या सांगण्यावरून रामदास शिंदे याने गावठी रिव्हालवर मधुन एक गोळी फायर करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून त्याचेकडील दहा लाख रुपये रोख रक्कम जबरीने चोरण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे वरील तीनही आरोपीना किवळे (ता खेड ) गावाचे हद्दीत गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा स्टील बॉडीचा त्याचे बटाचे वरील बाजूस काळे रंगाचे प्लॅस्टीकचे कव्हर असेलला व त्यास एक स्टीलचे मॅगझीन किंमत५ हजार रुपये, ४० हजार रुपायांची नंबर प्लेट नसलेली काळे पोपटी रंगाची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे ,खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले याबाबत पोलिस नाईक संजय नारायण नाडेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.