दारु संपली सांगितल्याने हॉटेलच्या मॅनेजरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 07:00 PM2019-09-11T19:00:02+5:302019-09-11T19:07:40+5:30
फिर्यादी हे चेसू मेस्ट्रो या हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम करतात.
पिंपरी : रात्री हॉटेलमध्ये वेटरकडे दारूची मागणी केली. त्या वेळी हॉटेलच्या मॅनेजरने त्या कंपनीची दारू संपली आहे दुसरी देऊ का असे विचारले. याचा राग येऊन आरोपीने साथीदारांना जमा करून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ९) रात्री सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथील चेसू मेस्ट्रो हॉटेलमध्ये घडली.
याप्रकरणी जैद जावेद मेमन (वय २२, रा. आकुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोन्या जाधव व त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चेसू मेस्ट्रो या हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम करतात. मंगळवारी सायंकाळी आरोपी सोन्या याने त्यांच्याकडे दारूची मागणी केली. फिर्यादी यांनी ती दारू संपली आहे, दुसरी देऊ का असे विचारले. याचा राग येऊन आरोपीने त्याच्या साथीदारांना बोलावून जैद यांना शिवीगाळ केली. तसेच कानाजवळ, हातावर व पाठीवर मारून जखमी करून पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.