तडीपार गुंडांनी शहरात येऊन केले १०२ गुन्हे; ‘एक्स्ट्रा’मार्फत त्यांच्यावर ठेवणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:49 AM2020-06-18T11:49:05+5:302020-06-18T11:52:24+5:30
हद्दपारीच्या काळात पुणे शहर व पुणे जिल्ह्यातविना परवानगी प्रवेश करेल, त्याचा त्वरीत अलर्ट मोबाईल अॅप्लिकेशनवर प्राप्त होऊन त्याच्यावर वेळीच कारवाई करणे शक्य होणार शहराचा वाढत विस्तार होत असल्याने तडीपार गुंडावर दिवसेंदिवस वैयक्तिक नजर ठेवणे अवघड होत आहे.
पुणे : पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासह जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही त्या काळात पुन्हा शहरात येऊन गुन्हे करण्याचे प्रमाणवाढले असून गेल्या दीड वर्षांत या तडीपारांनी तब्बल १०२ गुन्हे केल्याचेसमोर आले आहे.
शहराचा वाढत विस्तार होत असल्याने तडीपार गुंडावर दिवसेंदिवस वैयक्तिक नजर ठेवणे अवघड होत आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तडीपारांच्या घरी जाऊन खात्री करणे धोकादायक असल्याने पुणे शहर पोलिसांनी एक्स्ट्रा ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे आता तडीपार गुंडांवर नजर ठेवली जाणार आहे़. याबाबत पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी सांगितले की, गेल्या २०१९ पासून आतापर्यंत गेल्या दीड वर्षात तडीपार असताना शहराच्या हद्दीत प्रवेश करुन१०२ गुन्हे गेल्याचे आढळून आले आहे. त्यात एक खुन, ८ खुनाचा प्रयत्न, १६ आर्म अॅक्टचे गुन्हे, २ अंमली पदार्थ संबंधित गुन्हे, ६९ मुंबई पोलीसअॅक्टखालील गुन्हे आणि १ इतर असे १०२ गुन्ह्यांमध्ये तडीपार केलेल्या गुंडांचा समावेश आहे.
त्यामुळे शहरातून तडीपार केलेल्या गुंडावर नजर ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूूमीवर त्यांनी शहरात येऊ नये व तेशहराबाहेर ज्या ठिकाणी रहातात, तेथेच ते असल्याची खात्री करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातून कोरोनाच्या काळात त्यांच्यावर नजरही ठेवता येणार आहे. त्याचबरोबर संपकार्तून संभाव्य संसर्गही टाळता येणार आहे.
पुणे पोलिसांनी होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी वापरलेल्या ट्रॅकिंग सिस्टिमप्रमाणे तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली. त्याचा प्रत्यक्ष वापर नुकताच सुरु करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार विराज जगदीश यादव (वय २४, रा. सुशय सृष्टी अपार्टमेंट, हांडेवाडी रोड, हडपसर) याला पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी १ वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
यादव याला पुणे जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात येणार आहे. त्याच्या मोबाईलमध्ये हे अॅप्लिकेशन अपलोड करण्यात आले आहे. त्या आधारे त्यानेहद्दपारीच्या काळात ज्या ठिकाणी राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्या ठिकाणावरुन दररोज मोबाईल सेल्फीच्या माध्यमातून त्याची हजेरी घेण्यात येणार आहे. तसेच तो पुन्हा हद्दपारीच्या काळात पुणे शहर व पुणे जिल्ह्यातविना परवानगी प्रवेश करेल, त्याचा त्वरीत अलर्ट मोबाईल अॅप्लिकेशनवर प्राप्त होऊन त्याच्यावर वेळीच कारवाई करणे शक्य होणार आहे.