व्यापाऱ्याला लुटणारे गुन्हेगार जेरबंद, एक लाखांचा ऐवज हस्तगत

By शिवाजी पवार | Published: June 20, 2023 02:26 PM2023-06-20T14:26:28+5:302023-06-20T14:27:23+5:30

श्रीरामपूर पोलिसांची कामगिरी; सोन्याची चेन, रोख रक्कम व मोबाईल ताब्यात

Criminals who robbed a businessman jailed, get compensation of one lakh | व्यापाऱ्याला लुटणारे गुन्हेगार जेरबंद, एक लाखांचा ऐवज हस्तगत

व्यापाऱ्याला लुटणारे गुन्हेगार जेरबंद, एक लाखांचा ऐवज हस्तगत

googlenewsNext

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): तालुक्यातील टिळकनगर परिसरात व्यापाऱ्यास लुटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात मुद्देमालासह अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याची चेन, रोख रक्कम व मोबाईल असा एक लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. आरोपींमध्ये रईस शेरखान पठाण (वय २८, रा. टिळकनगर, ता. श्रीरामपूर) व रोहित सोपान रामटेके (वय ३१, रांजणखोल, ता. राहता) यांचा समावेश आहे. अन्य एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.

बेलापूर येथील बाळकृष्ण गोविंद खोसे यांना रविवारी टिळकनगर येथे दोघा जणांनी अडवले होते. खोसे यांच्या मोटारसायकलवर बसून शस्त्राचा धाक दाखवत त्यांना निर्जन स्थळी नेण्यात आले. तेथे खोसे यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याची चेन, रोख रक्कम व मोबाईल असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लुटला होता. गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती तसेच सीसीटीव्ही चित्रणावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी जेरबंद केले.

Web Title: Criminals who robbed a businessman jailed, get compensation of one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.