कल्याण डोंबिवलीमधील भाईंचा मुक्काम आता जेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 02:39 PM2022-03-19T14:39:36+5:302022-03-19T14:39:49+5:30

दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई ,आणखी पाच जन पोलिसांच्या रडारवर, वाढत्या गुन्हेगारी विरोधात पोलिसांची कारवाई

criminals's stay in Kalyan Dombivali is now in jail | कल्याण डोंबिवलीमधील भाईंचा मुक्काम आता जेलमध्ये

कल्याण डोंबिवलीमधील भाईंचा मुक्काम आता जेलमध्ये

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

कल्याण- कल्याण डोंबिवली मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे .गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कल्याणातील आशिष पांडे व डोंबिवलीतील त्रिशांत साळवे या दोन गुंडाची जेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे .दोघाविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत .कल्याण डिसीपी सचिन गुंजाळ यांनी आणखी पाच जनावर ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली आहे .एकूणच वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता गुंडा विरोधात कंबर कसल्याचे दिसून येत आहे

कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून मारामारी आणि इतर घटनांमध्ये वाढ झाली आहे .यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे .या गुंडांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीविरोधात ठोस कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू केली .गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची रवानगी आता थेट जेल मध्ये केली जात आहे .

आरोपी विरोधात एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे .कल्याण पूर्वेतील खडगोलवली परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आशिष पांडे विरोधात कारवाई करत कोलशेवाडी पोलिसांनी त्याची रवानगी येरवडा जेल मध्ये करण्यात आली आहे .आशिष विरोधात विठ्ठलवाडी व कोसळेवाडी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करने ,धमक्या देणे ,दंगा करणे असे गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत .मानपाडा पोलिसांनी पिसवली परिसरात राहणाऱ्या त्रिशांत साळवे याची रवानगी नाशिक जेल मध्ये करण्यात आली आहे .विशाल विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंग ,शिवीगाळ ,दमदाटी ,मारहाण करुऩ गंभीर दुखापत ,जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल होते .एमपीडीए अंतर्गत कारवाई एका वर्षासाठी करन्यात अली असून आरोपी एक वर्ष जेल मध्ये राहणार .,आणखी पाच जणांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई केली जाणार आहे .

Web Title: criminals's stay in Kalyan Dombivali is now in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.