Indo-Nepal Border वर कोटींचे चरस जप्त; SSB ने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 21:38 IST2021-04-22T21:37:34+5:302021-04-22T21:38:05+5:30
Drugs Case : जप्त केलेल्या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी 20 लाख असल्याचे सांगितले जाते.

Indo-Nepal Border वर कोटींचे चरस जप्त; SSB ने केली कारवाई
बिहारच्या बेतियाहून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळी तस्कर गजेंद्र यादव याला ४. ९ किलो चरससह अटक करण्यात आली आहे. भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या नरकटियागंज येथून या तस्कराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या चरसची किंमत लाखो रुपये मानली जात आहे.
माहिती देताना एसएसबीच्या 44 व्या बटालियनचे कमांडंट शैलेश कुमार सिंह म्हणाले की, नेपाळ सीमेवर आमटोला येथे एसएसबीच्या कारवाई दरम्यान ४. ९ किलो चरससह नेपाळी तस्कर गजेंद्र यादव याला अटक करण्यात आली असून भानगाहा पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जप्त केलेल्या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी 20 लाख असल्याचे सांगितले जाते.
त्याचवेळी इंडो नेपाळ सीमेजवळून काही चरस तस्करांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. एसएसबीने गुप्त माहितीवरुन ही कारवाई केली. दिल्ली व मुंबई येथे पाठविण्यात येणार असलेल्या नेपाळमार्गे चारसची खेप भारतात आणली जात होती. परंतु एसएसबीच्या या कारवाईने चारस तस्करांचा हेतू हणून पडला आहे आणि मोठ्या प्रमाणात चरस हस्तगत करण्यात आले. एसएसबीने सांगितले की, ते तस्करांच्या निशाण्यावर इतर ठिकाणी छापे टाकत आहेत आणि लवकरच याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत नितीशकुमार सरकार कठोर आहे. अशा तस्करांवर कारवाई करण्याचे कडक आदेश सरकारने दिले आहेत. पोलिस अशा तस्करांना सातत्याने छापा घालून अटक करत आहेत.