कोटींच्या मास्कचा काळाबाजार उघड, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:16 PM2020-03-24T13:16:38+5:302020-03-24T13:20:03+5:30
देशमुख यांच्यासोबत पोलीस आयुक्त परमबिर सिंह हे देखील उपस्थित होते.
मुंबई - कोरोनाच्या पाशर्वभूमीवर मास्कची वाढती मागणी लक्षात घेता मास्कचा काळा बाज़ार करणाऱ्यांचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. जास्तीच्या भावाने मास्कची विक्री करण्यासाठी अंधेरी आणि भिवंडीच्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला १४ कोटी १३ लाख किंमतीचा तब्बल २५ लाख २१ हजार मास्कचा साठा गुन्हे शाखेने जप्त केला आहे. याप्रकरणात चौघांना अटक करत पसार आरोपींचा शोध सुरु आहे. यात गोडाऊन मालक शाहरुख अकील शेख (२३), गुलाम मुर्तजा मुशनीर अली (२०) यांच्यासह माल ठेवणारा मिहीर दर्शन पटेल (३६) जी त्याचा ऑपरेटर बालाजी नाडर (३६) यांना अटक करण्यात आली आहे.
वांद्रे येथे १५ कोटींचे २५ लाख मास्क जप्त केल्याची कारवाई एफडीए आणि मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने केली आहे. देशभरात कोरोनाचा हाहाकार पाहता राज्यात कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच नागरिक कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी सॅनिटाइझर्स आणि मास्कच्या खरेदी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझर्सचा काळाबाजार आणि भेसळ देखील खूप होताना दिसत आहेत. मुंबईच्या गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पोलिसांनी तीन ट्रक भरून मास्क हस्तगत केले आहेत. तब्बल अंदाजे २६ लाख मास्क पोलिसांनी हस्तगत केले आहेत. काळाबाजार करण्यासाठी हे मास्क आणल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. बाजारात या मास्कची किंमत १५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखा ९ ला भेट देत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत पोलिसांचे कौतुक केले. यावेळी देशमुख यांच्यासोबत पोलीस आयुक्त परमबिर सिंह हे देखील उपस्थित होते.
गुन्हे शाखा कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई यांच्या पथकाने अंधेरीत कारवाई केली. पोलीस कारवाईत त्यांना तीन ट्रकभरून मास्क आढळून आले. तब्बल २६ लाखा हे मास्क असून बाजारात या मास्कची किंमत १४ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः गुन्हे शाखेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पोलीस आयुक्त परमबिर सिंग हे देखील उपस्थित होते.
मुंबई - वांद्रे येथे १५ कोटींचे २५ लाख मास्क जप्त, एफडीएची कारवाई आणि क्राईम ब्रँचची कारवाई https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) March 24, 2020
गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की अंधेरी आणि भिवंडी येथील गोडाऊनमधून २५ लाख मास्क हस्तगत करण्यात आले. त्यापैकी ३ लाख एन९५ मास्क असून एकूण १५ कोटींचे मास्क पोलिसांनी इसेन्शियल कमोडिटी ऍक्टअन्वये जप्त केले असून चार जणांना अटक केली आहे. तर दोन फरार आरोपींना पोलीस लवकरच अटक करतील असे पोलीस पुढे म्हणाले. या कारवाई एकूण १४ कोटी १३ लाख ९९००० हजार किंमतीचा २५ लाख २१ हजार ८०० मास्क हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखोंचे मास्क बाजारात
यापूर्वी लाखो रुपये किंमतीच्या मास्कची या मंडळीने विक्री केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यात मेडिकल मालक तसेच काही दलाल मंडळीना हाताशी धरून काही मालाची विक्री करण्यात आली आहे.
२० रूपयांत विक्रीचा प्रयत्न
अटक चौकड़ीच्या चौकशीतून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मास्कची मागणी लक्षात घेता ही मंडळी २० रुपयाहून अधिक किंमतीने या मास्कची मेडिकल तसेच अन्य दलालांकड़े विक्री करण्याचा प्रयत्नात होती. तसेच भविष्यातील मागणी नुसार ते भाव ठरवणाऱ होते.
मास्टरमाइंडचा शोध सुरु
चौकडीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठड़ी सुनावण्यात आली आहे. यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे? तसेच आणखीन किती जणांचा यात सहभाग आहे? शिवाय त्यांनी हा माल कोठून व कसा आणला ? आदिंबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.