Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमवर जमावाचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 11:28 AM2021-11-17T11:28:56+5:302021-11-17T11:29:45+5:30
Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉन्रोग्राफी केसमध्ये सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह 14 राज्यांतील 77 ठिकाणांवर छापा मारला होता. ओडिशामध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून स्थानिक भडकले. यानंतर त्यांनी सीबीआयच्या टीमवर हल्ला केला.
ओडिशाच्या ढेंकानालमध्ये सीबीआय टीमला मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सीबीआयची टीम ऑनलाईन बालकांच्या लैंगिक शोषण प्रकरणी (Child Pornography) छापेमारी करण्यासाठी गेली होती. देशभरात 70 हून अधिक ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. यावेळी ढेंकानालमध्ये जमावाने सीबीआय टीमला मारहाण केली आहे. स्थानिक पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना जमावाच्या तावडीतून सोडविले आहे.
चाईल्ड पॉन्रोग्राफी केसमध्ये सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह 14 राज्यांतील 77 ठिकाणांवर छापा मारला होता. जालौन, मऊ सारख्या छोट्या जिल्ह्यांसह नोएडा, गाझियाबाद सारख्या मोठ्या शहरांत, नारौर, जयपूर, अजमेर ते तामिळनाडूच्या कोईंबतूर शहरांचा या छाप्यात समावेश आहे.
सीबीआय टीमने ओडिशाच्या ढेंकनालमध्ये सकाळी 7 वाजता सुरेंद्र नायक याच्या घरी छापा मारला. सीबीआयची टीम दुपारपर्यंत चौकशी करत होती. या दरम्यान कोणत्यातरी गोष्टीवरून स्थानिक भडकले. यानंतर त्यांनी सीबीआयच्या टीमवर हल्ला केला.
#WATCH | Odisha: A CBI team was attacked by locals in a village in Dhenkanal district where it had gone to conduct searches at a man's residence in a case related to online child sexual abuse material
— ANI (@ANI) November 16, 2021
"We've rescued them from the crowd," a police officer at the spot said pic.twitter.com/yuE0J7wVj5
देशातील वाढत्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या मुद्द्यावर सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी सीबीआय मंगळवारी सकाळपासून देशातील 76 ठिकाणी छापेमारी करत आहे. सीबीआय अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी 83 आरोपींविरुद्ध 23 एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात येत आहे.
लहान मुलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये 400% वाढ
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने अलीकडेच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये देशभरातील मुलांविरुद्ध होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये 400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे लैंगिक कृत्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीच्या प्रकाशन आणि प्रसारणाशी संबंधित आहेत.
यूपीमध्ये सर्वाधिक 170 प्रकरणे
2020 च्या NCRB डेटानुसार, उत्तर प्रदेश(UP) मध्ये मुलांविरुद्ध ऑनलाइन गुन्ह्यांची सर्वाधिक 170 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 144 आणि 137 केसेस येथे दाखल झाल्या आहेत. या यादीत केरळ (107) आणि ओडिशा (71) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.