स्वयंपाकास उशीर झाल्याने पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीला डिझेल ओतून पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 06:37 PM2022-02-06T18:37:01+5:302022-02-06T18:40:59+5:30
Crime News : बाबू उर्फ राहुल विठ्ठल पारधे (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली.
पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच स्वयंपाक बनिवण्यास उशीर झाला म्हणून तिच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. नेहरूनगर, पिंपरी येथे शनिवारी (दि. ५) दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली.
बाबू उर्फ राहुल विठ्ठल पारधे (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी २८ वर्षीय जखमी पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाला म्हणून फिर्यादी पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.