७ वर्षाच्या माहिराची नराधम बापाने केली गळा दाबून हत्या अन् स्वतः ही केलं विष प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:49 PM2021-12-06T17:49:03+5:302021-12-06T18:04:33+5:30

Murder Case And Suicide Attempt : गेल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला आणि 'माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे' असं सांगितलं. त्यानंतर आरोपीनं आपला फोन बंद करून ठेवला.

Cruel father strangled 7-year-old Mahira to death and poisoned himself | ७ वर्षाच्या माहिराची नराधम बापाने केली गळा दाबून हत्या अन् स्वतः ही केलं विष प्राशन

७ वर्षाच्या माहिराची नराधम बापाने केली गळा दाबून हत्या अन् स्वतः ही केलं विष प्राशन

Next

मुंब्रा : अवघ्या काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा झाल्यामुळे आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत असलेल्या सात वर्षांच्या माहिरा या चिमुरड्या मुलीची कौटुंबिक वादातून तिचे वडील अनिस मालदार याने गळा दाबून हत्या करून स्वत:ही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी संध्याकाळी मुंब्यात घडली.

येथील संतोष नगर भागातील अर्शद अपार्टमेंट या बिल्डिंगमधील तळमजल्यावर राहात असलेला अनिस बिगारी काम करतो, तसेच त्याला जुगार खेळण्याचा नाद आहे. त्याला नेहमी काम मिळत नसल्यामळे तो काम करून कुटुंब चालवत असलेली त्याची पत्नी सोफियाकडे नेहमी पैशाची मागणी करत होता. शुक्रवारी रात्री तिने तिच्या वैद्यकीय चाचणीसाठी त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाले. यावेळी तिने संतप्त होऊन ती मुलीसह वेगळी राहणार असल्याचे सांगितले. यामुळे रागाने तो मुलीला घेऊन बायपास रस्त्यावर गेला.

गेल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला आणि 'माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे' असं सांगितलं. त्यानंतर आरोपीनं आपला फोन बंद करून ठेवला. अनिसची पत्नी त्याला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचा फोन बंद लागत होता.तेथे त्याने प्रथम तिची गळा दाबून हत्या केली. नंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करून याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्याची माहिती सोफियाने दिली. दरम्यान, त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Cruel father strangled 7-year-old Mahira to death and poisoned himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.