निर्दयी! वडिलाचा राग काढला मुलीवर, शेजाऱ्यांच्या भांडणात चिमुकलीचा गळा चिरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 03:16 PM2020-11-12T15:16:11+5:302020-11-12T15:17:02+5:30

बुधवारी संशयित आरोपी बाळू मोतीराम मारेगामा (३४) हा वादाचा वचपा काढण्यासाठी धारदार चाकू घेवून संतोष मुरखे यांच्या घरी आला.

Cruel! The father's anger raise on the girl, kid's throat was slit in the quarrel of the neighbours | निर्दयी! वडिलाचा राग काढला मुलीवर, शेजाऱ्यांच्या भांडणात चिमुकलीचा गळा चिरला

निर्दयी! वडिलाचा राग काढला मुलीवर, शेजाऱ्यांच्या भांडणात चिमुकलीचा गळा चिरला

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी संतोष नारायण मुरखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आराेपी बाळू मारेगामा याच्यावर भादंवि ३०२ कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास वडकी ठाणेदार करत आहे.

वडकी (यवतमाळ) : शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होता. याचाच राग मनात धरून शेजारी राहात असलेल्या ३४ वर्षीय युवकाने वडिलाचा वचपा काढण्यासाठी अडीच वर्षाच्या मुलीचा गळा चिरून हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी सायंकाळी राळेगाव तालुक्यातील खेमकुंड येथे घडली. देविका संतोष मुरखे (अडीच वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. मुरखे व मारेगामा हे दोनही कुटुंब शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वादावादी सुरू होती.

बुधवारी संशयित आरोपी बाळू मोतीराम मारेगामा (३४) हा वादाचा वचपा काढण्यासाठी धारदार चाकू घेवून संतोष मुरखे यांच्या घरी आला. त्यावेळी मुरखे दाम्पत्य शेतावर सोयाबीन काढण्यासाठी गेले हाेते. मुलगी देविका ही अंगणात खेळत होती. सुडाने पिसाळलेल्या बाळूने रागाच्या भरात चिमुकल्या देविकाचा गळा चिरला. हा प्रकार पाहून शेजाऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती पोलीस पाटीलांनी वडकी ठाणेदार विनायक जाधव यांना दिली. मुरखे दाम्पत्यही शेतातून घरी आले. मुलीला गंभीर अवस्थेत पांढरकवडा येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी संतोष नारायण मुरखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आराेपी बाळू मारेगामा याच्यावर भादंवि ३०२ कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास वडकी ठाणेदार करत आहे.

Web Title: Cruel! The father's anger raise on the girl, kid's throat was slit in the quarrel of the neighbours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.